ETV Bharat / state

Psychiatric Woman Rape Case: मनोरुग्ण महिलेवर ऑटोचालकाचा अत्याचार; विवस्त्र निर्वस्त्र सोडून झाला होता, अखेर अटक - Psychiatric Woman Rape Case

भंडारा शहरालगतच्या गणेशपूर येथे एका 45 वर्षीय मनोरुग्ण महिलेला निर्जन स्थळी नेऊन अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला पोलिसांनी ५ दिवसांनी अटक केली आहे. बसूराज पंढरी नंदेश्वर (57 वर्षे, रा. रमाबाई आंबेडकर वार्ड भंडारा) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो व्यवसायाने ऑटो चालक आहे. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

Psychiatric Woman Rape Case
आरोपीस अटक
author img

By

Published : May 4, 2023, 10:37 PM IST

अत्याचारी ऑटोचालकाच्या अटकेप्रकरणी पोलिसांची प्रतिक्रिया

भंडारा : गणेशपूर येथील 45 वर्षीय मनोरुग्ण महिला ही तिच्या भावाच्या घरी राहत असे. घटनेच्या दिवशी 28 एप्रिलला ती सायंकाळी घरी न गेल्याने तसेच परिसरात कुठेही दिसत नसल्याने कुटुंबीयांनी ३० तारखेला ती हरविल्याची तक्रार दिली. पोलिसांना तक्रार मिळताच तपास सुरू करण्यात आला. ३० तारखेला दुपारी ३ च्या दरम्यान ही महिला स्मशानभूमीकडे जाणाऱ्या निर्जन स्थळी विवस्त्र आणि बेशुद्धावस्थेत सुरक्षा भिंतीच्या पायथ्याशी आढळली. पोलिसांनी त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणीत या महिलेवर अत्याचार झाल्याचे समोर आले; मात्र ती महिला काहीही सांगण्याच्या परिस्थितीत नसल्याने पोलिसांनी आपले तपासाचे चक्र वेगळ्या दिशेने फिरविले.

आरोपीने सांगितले सत्य: परिसरातील सर्व सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता एक ऑटो रिक्षा (MH-36-H-4977) हा सायंकाळी साडेसात वाजता स्मशानभूमीकडे जाताना दिसला. तो रात्री साडेबारा वाजेला परत येताना दिसला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. या आधारे संबंधित ऑटोचालकास अटक करून त्याची चौकशी केली असता सत्य समोर आले. घटनेच्या दिवशी आरोपीने महिलेला गणेशपूर परिसरातून आपल्या ऑटोमध्ये बसविले. त्यानंतर गणेशपूर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून निर्जन स्थळी महिलेला नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. नंतर त्या महिलेला निर्वस्त्र अवस्थेत सोडून आरोपी ऑटोसह घटनास्थळावर पसार झाला.

तर इतर आरोपींचाही शोध घेऊ: 28 एप्रिलच्या रात्रीपासून तर 30 एप्रिल दुपारी दोन वाजेपर्यंत ही महिला त्या निर्जस्थळी विवस्त्र तशीच पडलेली होती. पोलिसांनी या महिलेला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून हळूहळू ती बरी होत आहे. ती पूर्ण बरी झाल्यावर तिच्या माहितीच्या आधारे या प्रकरणात अजून कोणी आरोपी होते का? याचाही तपास केला जाणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. आरोपीवर विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले गेले आहेत.

'त्या' घटनेची आठवण ताजी: या घटनेनंतर आठ महिन्यांपूर्वी लाखनी येथे मनोरुग्ण महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची आठवण ताजी झाली. त्या घटनेनंतर मनोरुग्ण महिलांचा शोध घेऊन त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतल्या जाईल, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले होते; मात्र आज भंडारा शहरात किती मनोरुग्ण महिला फिरत आहेत किंवा कुठेही वास्तव्याला असतात. या विषयाची कोणतीही माहिती पोलीस अधीक्षक देऊ शकले नाही.

हेही वाचा: DRDO Director Arrested: डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हनीट्रॅपचे शिकार, एटीएसने केली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.