ETV Bharat / state

खासदार सुनील मेंढेंच्या विरुद्ध न्यायालयात याचिका; शपथपत्रात माहिती लपवल्याचा आरोप - खासदार सुनील मेंढे विरुद्ध न्यायालयात याचिका

भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या वेळी खासदार सुनील मेंढे यांनी उमेदवारी अर्ज भरताना जे शपथपत्र सादर केले होते, त्यात खोटी माहिती देऊन आवश्यक असलेली माहिती लपवली असल्याचा आरोप या पत्रात केला आहे.

MP Sunil Mendhe
खासदार सुनिल मेंढे
author img

By

Published : Jun 27, 2020, 5:18 PM IST

भंडारा - खासदार सुनील मेंढे यांच्याविरुद्ध भंडारा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या वेळी खासदार सुनील मेंढे यांनी उमेदवारी अर्ज भरताना जे शपथपत्र सादर केले होते, त्यात खोटी माहिती देऊन आवश्यक असलेली माहिती लपवण्यात आली असल्याचा आरोप या पत्रात केले आहे. न्यायालयात काल (ता. २६ जून) या याचिकेची सुनावणी होऊन १० जुलै २०२०ला खासदार सुनील मेंढे यांना न्यायालयात आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.

भंडाराचे काँग्रेस कार्यकर्ते धनराज साठवणे आणि नितीन धकाते यांनी ही याचिका दाखल केली आहे. याचिकेमध्ये खासदार सुनील मेंढे यांच्यावर २०१९ च्या भंडारा लोकसभा निवडणुकीच्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी जे शपथपत्र सादर केले होते. त्यात खोटी माहिती दिली असून आवश्यक माहिती लपविण्यात आली आहे. तसेच त्यांनी त्यांची आर्थिक मालमत्ता आणि त्यांच्यावर असलेले गुन्हे यांची माहिती लपवली असल्याचेही तक्रारकर्त्याने म्हटले आहे.

हेही वाचा... देशात कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली पाच लाख पार, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

खासदार मेंढे यांनी जनप्रतिनिधी कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे आरोप याचिकाकर्त्याने केले आहे. खासदार सुनील मेंढे यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. न्यायालयाने याची दखल घेत मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दि. २६ रोजी नोटीस जारी करून दि. 10 जुलैला खासदार सुनील मेंढे त्याची बाजू मांडण्यासाठी हजर होण्यास सांगितले आहे. याचिकाकर्त्यांकडून अ‍ॅड. सतिश उके, अ‍ॅड. वैभव जगताप, अ‍ॅड. आरिफ खान यांनी फौजदारी मुकदमा दाखल केला आहे.

याविषयी खासदार सुनिल मेंढे यांना विचारले असता त्यांनी, आपण शपथपत्रात संपूर्ण माहिती दिली होती. कोणतीही माहिती लपवलेली नाही. हा सर्व राजकीय आसकापोटी केलेला प्रकार आहे. माझा न्यायालयावर विश्वास आहे त्यामुळे याविषयी जास्त भाष्य न करता याचिकाकर्त्यांना न्यायालयात उत्तर देऊ, असे त्यांनी सांगितले.

सुनील मेंढे हे 2016 नगराध्यक्ष झाल्यानंतर तेव्हाही धनराज साठवणे यांनी सुनील मेंढे यांनी शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करून त्यांचे नगराध्यक्ष पद रद्द करावे, अशी याचिका दाखल केली होती. तर फेब्रुवारी महिन्यात 33 पैकी 18 नगरसेवकांनी त्यांनी अध्यक्ष पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करून त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.