ETV Bharat / state

भंडारा : किराणा आणि भाजी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड

अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची खरेदी करण्यासाठी अक्षरश झुंबड उडाली. किराणा दुकान आणि भाजी दुकानांमध्ये नागरिकांनी गर्दी केली. यावेळी ग्राहकांनी व दुकानदारांनी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले.

people crowd for buying groceries in bhandara
भंडारा : किराणा आणि भाजी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड
author img

By

Published : Apr 22, 2021, 5:15 PM IST

भंडारा - राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधांमध्ये बदल करण्यात आला असून अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची खरेदी करण्यासाठी अक्षरश झुंबड उडाली. किराणा दुकान आणि भाजी दुकानांमध्ये नागरिकांनी गर्दी केली. यावेळी ग्राहकांनी व दुकानदारांनी कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले. येथे येणाऱ्या नागरिकांच्या तोंडाला मास्क नाही, तर कुठे सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले.

किराणा आणि भाजी दुकानात गर्दी -

बुधवारपासून सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, भाजी दुकान, मटन दुकान, बेकरी यासारख्या गोष्टी सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू राहतील, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. या आदेशानंतर सकाळी 7 वाजेपासून नागरिकांनी दुकानांवर खरेदीसाठी गर्दी केली. जिल्ह्यातील प्रत्येक किराणा दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली. लॉक डाऊन लागल्यास घरात जास्तीत जास्त सामानाचा साठा करून ठेवण्यासाठी नागरिकांनी अकराच्या आत किराणा सामान कसा मिळवता येईल, यासाठी धावपळ करताना दिसले. जी परिस्थिती किराणा दुकानात होती. तीच परिस्थिती भाजी मार्केटमध्ये दिसली. दुकानांवर भाजी खरेदी करताना नागरिकांना जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेला आहे. त्यामुळे आपल्याला सोशल डिस्टंसिंग ठेवायचा आहे, याचा विसर नागरिकांना पडला होता. केवळ जास्तीत जास्त सामान आपल्याला कसे मिळेल. याची सगळ्यांना लगबग दिसत होती. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडालेला दिसला.

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक -

काही नागरिक किराणा खरेदी करण्यासाठी, काही भाजी खरेदी करण्यासाठी, काही अन्नधान्ये आणि मटण वगैरे खरेदी करण्यासाठी बाहेर निघाले, तर काही निव्वळ फेरफटका मारण्यासाठी बाहेर निघाले. त्यामुळे बुधवारी भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक रस्त्यावर आलेली दिसली.

यामुळे झाली गर्दी -

महाराष्ट्र शासनाने 15 एप्रिलपासून संचारबंदी लावली आणि अत्यावश्यक सेवेचे दुकान सोडता बाकी सर्व दुकाने बंद केली. त्यानंतर 17 एप्रिल पासून 20 एप्रिलपर्यंत भंडारा जिल्ह्यातील किराणा व्यापारी संघटनेने स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली, तर सोमवार आणि मंगळवार भाजी मार्केट स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आले. त्यानंतर बुधवारी दुकाने सुरू झाली. मात्र, त्यांची वेळ ही सकाळी 7 ते 11 होती. त्यातच गुरूवारपासून लॉकडाऊन लागण्याची शक्यता होती. या सगळ्या गोष्टींमुळे नागरिक घराबाहेर पडले आणि सर्वत्र केवळ आणि केवळ गर्दी दिसत होती. 11 च्या आत सामान खरेदी करण्यासाठी नागरिकांनी केलेली गर्दी आपण समजू शकतो. मात्र, सामान खरेदी करण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचा विसर का पडला, नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव का नसावी, कोरोनाची भीती नागरिकांच्या मनात का नसावी, असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.

हेही वाचा - ऑक्सिजन गळती प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती - आरोग्य मंत्री राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.