ETV Bharat / state

पवनी तालुक्यातील प्रसिद्ध रांझी गणपती मंदिर पहिल्यांदाच पाण्याखाली - रांझी गणपती मंदिर पाण्याखाली

पौराणिक असलेल्या रांझी गणपतीच्या मंदिरात वैनगंगा नदीच्या पाण्याने प्रवेश केला आहे. गोसे धरणाची सर्व 33 दारे 4 मीटरने उघडल्यानंतर पवनी तालुक्यतील वैनगंगा नदीला पूर आला.

भंडारा
भंडारा
author img

By

Published : Aug 30, 2020, 9:42 AM IST

भंडारा - जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील प्रसिद्ध रांझी गणपती मंदिर पहिल्यांदाच पाण्याखाली गेले आहे. या अगोदर 1994 मध्ये या मंदिरापर्यंत पुराचे पाणी आले होते. त्यावेळी गणपती मूर्तीच्या चरणाला पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर पूर ओसरला. मात्र, शनिवारी दुपारी दोन फूट पाणी वाढल्यानंतर सायंकाळपर्यंत पाणी पातळी वाढून 6 फुटांपर्यंत गेल्याने संपूर्ण मंदिर पाण्याखाली गेले.

प्रसिद्ध रांझी गणपती मंदिर पहिल्यांदाच पाण्याखाली

पौराणिक असलेल्या रांझी गणपतीच्या मंदिरात वैनगंगा नदीच्या पाण्याने प्रवेश केला आहे. गोसे धरणाची सर्व 33 दारे 4 मीटरने उघडल्यानंतर पवनी तालुक्यतील वैनगंगा नदीला पूर आला. पवनीच्या दिवाणघाट परिसरात असलेल्या सुप्रसिद्ध रांझीच्या गणपती मंदिरापर्यंत पाणी आल्यास गणपतीच्या चरणाला स्पर्श करून हळुहळु पाणी उतरतीस लागते, अशी आख्यायिका आहे. मात्र, यंदा पाणी वाढतच असून दहा वर्षांपासून पवनीकर जनतेने इतका मोठा पूर पाहिलेला नाही.

हेही वाचा - पोल्ट्रीफार्ममध्ये महापूराचे पाणी शिरल्याने 3500 कोंबड्यांचा मृत्यू, साडेतीन लाखांचे नुकसान

येथील दिवाण घाटावर असलेल्या मारुती मंदिरातील मूर्तीच्या पायापर्यंत पाणी आले आहे. पुराचे पाणी काठावरून मोकळ्या पटांगणापर्यंत आल्याने महिलांनी गंगेला ओटीदेखील भरली. काही वर्षांनंतर दिसणारे गंगेचे विराट रूप पाहण्यासाठी लोकांनी गोसे धरण व पवनी येथील विविध घाटांवर गर्दी केली आहे. गणपती मंदिर पाण्याखाली आल्याने नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. पूर ओसरावा म्हणून लोकांनी गणपतीला साकडे घातले आहे. संततधार पावसामुळे ग्रामीण भागातून येणारे अनेक मार्ग बंद झाले आहेत. नदी-नाले तुडुंब भरून वाहत असल्याने छोट्या-मोठ्या पुलांवर पाणी साचल्याने वाहतूक थांबली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.