ETV Bharat / state

मी जिल्ह्याचा पालकमंत्री, ही माझी कर्मभूमी, मग मी बाहेरचा कसा? - परिणय फुके - parinay fuke

साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे पालकमंत्री परिणय फुके हे भंडारा-गोंदिया विधानपरिषदचे आमदार आहेत. मात्र, यावर्षी त्यांना साकोली मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढावी लागत आहे. यावेळी त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी चर्चा केली.

ईटीव्ही भारतशी चर्चा करताना परिणय फुके
author img

By

Published : Oct 6, 2019, 8:50 AM IST

भंडारा - साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवणारे पालकमंत्री परिणय फुके हे भंडारा-गोंदिया विधानपरिषदचे आमदार आहेत. मात्र, यावर्षी त्यांना साकोली मतदारसंघातून विधानसभेतून निवडणूक लढावी लागत आहे. त्यांना उमेदवारी दिल्यामुळे विद्यमान आमदार बाळा काशीवार यांचे तिकीट कापले गेले. यावेळी त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी चर्चा केली.

'ईटीव्ही भारत'शी चर्चा करताना परिणय फुके

भाजपने कोणालाही उमेदवारी दिली तरी तो निवडून येतो. मग नाना पटोले यांची भीती होती का? या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की, भाजपमध्ये प्रत्येक वेळेस नवीन चेहऱ्यांना संधी मिळत असते. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत 35 लोकांचे तिकीट कापून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली, ही भाजपची पद्धत आहे. बाळा काशीवार यांना येत्या काळात नवीन जबाबदारी मिळणार आहे.

हेही वाचा - राज्यमंत्री परिणय फुके, नाना पटोलेंचे शक्ती प्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल

मला लोकांमधून निवडून येऊन आमदार होण्याची इच्छा पहिल्यापासूनच होती. आमचे मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि अमित शहा या वरिष्ठांच्याही मते मंत्रिपद भूषविणाऱ्या लोकांनी लोकांमधून निवडून यावे, असे आदेश असल्यामुळे मला साकोलीची जबाबदारी देण्यात आली आहे. माझे विरोधक मला बाहेरील व्यक्ती म्हणून प्रचार करत आहे. मात्र, मी मागील ३ वर्षांपासून भंडारा-गोंदियातून विधानपरिषदेवर आमदार आहे. भंडाऱ्याचा पालकमंत्री आहे. या ३ वर्षांत मी जिल्ह्यासाठी खूप काम केले आहे आणि माझे मतदान हे भंडारामध्ये आहे. असे असताना मी बाहेरील व्यक्ती कसा? असा प्रश्न त्यांनी यावेळेस आपल्या विरोधकांना विचारला आहे. मी केलेल्या कामामुळेच मतदार मला निवडून देतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मी साकोली विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यास इतिहासात पहिल्यांदाच या मतदारसंघाला एक मंत्री मिळणार आहे. तसेच या मतदारसंघाला मंत्री मिळाल्यास या जिल्ह्याचा नक्कीच विकास होणार आहे. त्यामुळे लोक मला निवडून देतील आणि या निवडणुकीत मी जवळपास 70 हजार मतांनी निवडून येईन, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.

हेही वाचा - साकोली मतदारसंघातील जनतेला अजूनही विकासाची प्रतीक्षा

Intro:ANC :

Body:साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवणारे पालकमंत्री परिणय फुके हे भंडारा गोंदिया चे विधानपरिषद चे आमदार आहेत मात्र यावर्षी त्यांना साकोली विधानसभेतून निवडणूक लढावी लागत आहे त्यांना उमेदवारी दिल्यामुळे विद्यमान आमदार बाळा काशीवार यांची तिकीट कापल्या गेली.
भाजपा कोणालाही उमेदवारी दिली तरी तो निवडून येतो मग नाना पटोले यांची भीती होती का या प्रश्नाचे उत्तर देतांना त्यांनी सांगितले की भाजपामध्ये प्रत्येक वेळेस नवीन चेहऱ्यांना संधी मिळत असते त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीत 35 लोकांची तिकीट कापून नवीन चेहरे देण्यात आले ही भाजपाची पद्धत आहे बाळा काशीवार यांना येत्या काळात नवीन जबाबदारी मिळणार आहे.
मला लोकांमधून निवडून येऊन आमदार होण्याची इच्छा पहिल्यापासूनच होती आणि आमचे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री आणि अमित शहा या वरिष्ठांच्या ही मते मंत्रीपद भूषविणाऱ्या लोकांनी लोकांमधून निवडून यावे असे आदेश असल्यामुळे मला साकोली ची जबाबदारी देण्यात आली आहे.
माझे विरोधक मला बाहेरील व्यक्ती म्हणून प्रचार करत आहे मात्र मी मागील तीन वर्षापासून भंडारा-गोंदिया चा विधानपरिषद आमदार आहे भंडाऱ्याचा पालकमंत्री आहे या तीन वर्षात या जिल्ह्यासाठी खूप काम केलेली आहे आणि माझे मतदान हे भंडारा मध्ये आहे अशा असतांना मी बाहेरील व्यक्ती कसा असा प्रश्न त्यांनी यावेळेस आपल्या विरोधकांना विचारलेला आहे मी केलेल्या कामामुळेच मतदार मला निवडून देतील असेही त्यांनी सांगितले.
मी साकोली विधानसभा क्षेत्रातून निवडून आल्यास इतिहासात पहिल्यांदाच या विधानसभा क्षेत्राला एक मंत्री मिळणार आहे आणि मंत्री मिळाल्यास या क्षेत्राचा या जिल्ह्याचा नक्कीच विकास होणार आहे त्यामुळे लोक मला निवडून देतील आणि या निवडणुकीत मी जवळपास 70 हजार मतांनी निवडून येईल असा विश्वास त्यांनी दाखविला.
दिपेंद्र गोस्वामी, इटीव्ही, साकोली

Conclusion:anc : मला लोकांमधून निवडून येऊन आमदार बनायचं होता आणि आमच्या वरिष्ठांनी सुद्धा तसा आदेश काढला की मंत्री पदावर असलेल्या लोकांनी लोकांमधूनच निवडून यावे त्यामुळे मी साकोली विधानसभा क्षेत्राचे निवडणूक लढवीत आहे,
मागील तीन वर्षात मी या जिल्ह्यात भरपूर कामे केलेली आहेत या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे माझे मतदान भंडारा मध्ये आहे मग मी बाहेरचा कसा असा प्रश्न पालकमंत्री परिणय फुके यांनी त्यांच्या विरोधकांना केला आहे. मी निवडून आल्यास इतिहासात पहिल्यांदाच या विधानसभा क्षेत्राला मंत्री लाभणार आहे आणि मंत्री झाल्यास या विधानसभा क्षेत्राचा दुपटीने विकास होणार आहे असे पालकमंत्री यांनी ईटीव्ही च्या प्रतिनिधी ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.