ETV Bharat / state

भंडारा जिल्हा परिषद : केवळ 10 टक्केच कर्मचारी वेळेत कार्यालयात - भंडारा जिल्हा परिषद बातमी

मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन कामकाज आठवड्यातून पाच दिवसांचे केले आहे. यामुळे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस कर्मचाऱ्यांचे सुट्टीचे असतात.

only-10-percent-of-government-employees-are-in-office-on-time-at-bhandara
केवळ 10 टक्केच कर्मचारी वेळेत कार्यालयात...
author img

By

Published : Jul 15, 2020, 12:58 PM IST

भंडारा - जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधनच उरले नाही. मागील काहीच महिन्यापूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा मंजूर झाला. कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळ ही सकाळी पावणे दहा ते सायंकाळी साडेसहापर्यंत करण्यात आली. मात्र भंडारा जिल्ह्यातील कर्मचारी आणि अधिकारी हे सकाळी पावणे दहा ते साडे दहापर्यंत कोणत्याही वेळेवर येतात. त्यामुळे जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना वेळेचे बंधन नाही का, असा प्रश्न निर्माण होत आहे.

केवळ 10 टक्केच कर्मचारी वेळेत कार्यालयात...

मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नाही का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे कार्यालयीन कामकाज आठवड्यातून पाच दिवसांचे केले आहे. यामुळे शनिवार आणि रविवार हे दोन दिवस कर्मचाऱ्यांचे सुट्टीचे असतात. मात्र, सलग सुट्ट्यांमुळे लोकांच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून शासनाने या कर्मचाऱ्यांचे शासकीय कार्यालयीन वेळ वाढवला आहे. हा वेळ सकाळी पावणे दहा ते सायंकाळी साडेसहापर्यंत करण्यात आला आहे. मात्र, कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधन राहीले नाही असेच दिसून येत आहे.

जिल्हा परिषदेची खरी परिस्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी ईटीव्ही भारतचे भंडारा प्रतिनिधी जिल्हा परिषद कार्यालयात गेले. त्याठिकाणी पाहणी केली असता कार्यलयीन कामकाजाच्या वेळेत केवळ 10 टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, जलसंधारण विभाग, शिक्षण विभाग, मुख्य कार्यकारी अधिकारी कक्षातील कर्मचारी, अधिकऱ्यांपैकी पावणे दहाच्या वेळेत काहीच कर्मचारी उपस्थित होते. केवळ कर्मचारीच नाही तर विभाग प्रमुख सुद्धा अनुपस्थित होते.

उप-मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देखील वेळेत कार्यालयात नव्हते. त्यामुळे या उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कोणाचे नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. काही कर्मचारी तर चक्क साडेदहानंतर कार्यालयात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या कधीच कॅमेऱ्यासमोर बोलत नाहीत. त्यामुळे त्यांना या कर्मचाऱ्यांविषयी विचारणा करण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे अनियंत्रित, वेळेचे बंधन नसलेल्या भंडारा जिल्ह्या परिषदच्या कर्मचाऱ्यांना शिस्त लागेल का, याविषयी पालकमंत्री सुनील केदार यांना विचारले असता त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाच्याकडून माहिती घेतो, असे सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.