भंडारा - जिल्ह्यात सोमवारी पुन्हा एक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला असून एका रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मागील चार दिवसांपासून सतत कोरोनाचे रुग्ण बरे होत असून आतापर्यंत 25 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आता फक्त 17 रुग्ण उपचार घेत आहेत. आज सापडलेला रुग्ण हा पवनी तालुक्यातील मालची गावातील असल्याने या गावाला कंटेन्मेंन्ट झोन म्हणून घोषित केले आहे. तर या अगोदर घोषित गणेशपूरमधील कंटेन्मेंन्ट झोन उठविण्यात आले आहे.
पवनी तालुक्यातील 29 वर्षीय तरुण 23 मे रोजी दत्तवाडी (नागपूर) वरून आला होता. या तरुणाचा घश्याच्या नमुना तपासणीला पाठविला असता पॉझिटिव्ह आला. यामुळे रुग्णसंख्येत वाढ होऊन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून 42 झाली आहे. तर आज एक कोरोना बाधित रुग्ण बरा झाल्याने कोरोनामुक्त लोकांची संख्या 25 झाली आहे. सध्या 17 रुग्ण हे उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णाचा संख्येत होणारी वाढीचे प्रमाण आता कमी झाली आहे.
कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला आजचा रुग्ण हा पवनी तालुक्यातील मालची गावातील असल्याने या गावाला केंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच कोंढा, कोसरा, पालोरा ( चै.), सेंद्रि (बु.) आणि सेंद्रि ( खुर्द) हे गाव बफर झोन म्हणून घोषित केले गेले आहेत. या अगोदर घोषित केलेल्या गणेशपूर क्षेत्रातील कंटेन्मेंन्ट झोन उठविला गेला आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात 2394 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 42 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 2248 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 104 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. आज 8 जूनला आयसोलेशन वार्ड मध्ये 28 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 355 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 171 भरती आहेत. 1890 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईनमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे, मुंबई व इतर राज्यातून 40710 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 30085 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे.
भंडारा जिल्ह्यात आज एकाने केली कोरोनावर मात, एक रुग्ण पॉझिटिव्ह - bhandarat corona update news
पवनी तालुक्यातील 29 वर्षीय तरुण 23 मे रोजी दत्तवाडी (नागपूर) वरून आला होता. या तरुणाचा घश्याच्या नमुना तपासणीला पाठविला असता पॉझिटिव्ह आला. यामुळे रुग्णसंख्येत वाढ होऊन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून 42 झाली आहे. तर आज एक कोरोना बाधित रुग्ण बरा झाल्याने कोरोनामुक्त लोकांची संख्या 25 झाली आहे. सध्या 17 रुग्ण हे उपचार घेत आहेत.