भंडारा - रेवा येथे जाण्यासाठी रात्रीच्या रेल्वेने जाताना माय-लेकाचा (Mother Son Fell from Train) धावत्या रेल्वेतून पडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या देव्हाडा - माडगी वैनगंगा नदी पुलावर घडली आहे. पूजा इशांत रामटेके (27) व अथर्व इशांत रामटेके (18 महिने) मृत माय - लेकाचे नाव आहे.
मध्यप्रदेशच्या रेवा येथे झाले होते रवानामूळचे नागपूर येथील टेकानाका परिसरातील रहिवासी इशांत रामटेके हे मध्येप्रदेश राज्याच्या रेवा येथे सैनिक रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. सुटी संपल्याने कुटुंबासह नागपूर रेल्वेस्थानकाहून रेवा येथे जाण्यासाठी रात्रीच्या रेल्वेने निघाला होते. तुमसर रेल्वे स्थानकावरून गाडी पुढील प्रवासात असताना पत्नीला लघुशंका लागल्याने पतीला सांगून ती दिड वर्षाच्या मुलासह रेल्वे डब्यातील शौचघराकडे गेली.
गोंदिया रेल्वे स्टेशनवर येथे दिली तक्रार
चोरीला गेलेली पत्नी आणि मुलगा बऱ्याच वेळा नंतर परत न आल्याने ईशांत रामटेके यांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, ती कुठेही आढळून न आल्याने गोंदिया रेल्वे स्टेशनवर त्यांनी त्यांची हरवल्याची तक्रार दिली.
दुसऱ्या दिवशी आढळले मृतदेह
ईशानच्या तक्रारीनंतर पूजा आणि अथर्व चा शोध घेण्यास सुरुवात झाली सोमवारी रेल्वे कर्मचारी पेट्रोलिंग वर असताना दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्यांना एका महिलेचा मृतदेह पुलावर लटकलेल्या स्थितीत आढळला. तर मुलाचा मृतदेह वैनगंगा नदीत पडल्याची माहिती रेल्वे पोलीस व करडी पोलिसांना दिली.
मुलासह आईचाही जीव गेला
पूजा ही शौचालयाला जाताना अथर्वला घेऊन गेली. अथर्व हा आईच्या पुढे पुढे होता. केवळ 18 महिन्याचा असल्याने धावत जात असताना त्याचा तोल गेला असावा आणि तो रेल्वेतून सरळ वैनगंगा नदीच्या पुलाच्या खाली नदीमध्ये पडला असावा. अथर्वला वाचविण्याच्या प्रयत्नात पूजाचाही तोल गेला असावा. मात्र, ती नदीत न पडता पुलाला आदळून तिथेच तिचा मृत झाला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला ईशान रामटेके यांनी दोन्ही मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.