ETV Bharat / state

MLA Raju Karemore Bail : रात्र तुरुंगात घातल्यानंतर आमदार राजू कारेमोरेंची सकाळी सुटका - MLA Raju Karemore arrest

आमदार राजू कारेमोरे यांना 15 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिल्यामुळे तुरुंगातून बाहेर सोडण्यात आले आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कारेमोरे यांनी पोलिसांनी आपल्या गुन्हेगार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला आहे.

राजू कारेमोरेंची तुरुंगातून सुटका
राजू कारेमोरेंची तुरुंगातून सुटका
author img

By

Published : Jan 4, 2022, 12:12 PM IST

भंडारा - तब्बल 12 तासांच्या तुरुंगावासानंतर आमदार राजू कारेमोरे यांची सुटका (MLA Raju Karemore Granted Bail )झाली आहे. 31 डिंसेबरच्या रात्री मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये ( Mohadi Police Station ) गोंधळ घातल्याप्रकरणी विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दिवसभरात जामीन रद्द आणि नंतर जामीन मंजूर झाल्याने गोंधळ उडाला होता.

रात्र तुरुंगात घातल्यानंतर आमदार राजू कारेमोरेंची तुरुंगातून सुटका

रात्र काढावी लागली तुरुंगात -

आमदार कारेमोरे यांना सोमवारी अटक केल्यानंतर दिवाणी व फौजदारी न्यायालय मोहाडी येथे हजर करण्यात आले. दिवसभराच्या सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला. त्यामुळे आमदार राजू कारेमोरे ( MLA Raju Karemore ) यांना सोमवारची रात्र तुरुंगात घालवावी लागेल हे स्पष्ट झाले होते. मात्र एका तासानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे कारेमोरे यांचा तुरुंगवास टळला असे वाटत होते. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल हा उशिरा आल्याने दिवाणी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे भंडारा जिल्हा कारागृहात (Bhandara District Jail ) रात्र काढावी लागली.

पोलिसांवर चोरीचा आरोप -

आमदार राजू कारेमोरे यांना 15 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिल्यामुळे तुरुंगातून बाहेर सोडण्यात आले आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर कारेमोरे यांनी पोलिसांनी आपल्या गुन्हेगार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांवर 50 लक्ष चोरीचा आरोप करत ते लपविण्यासाठी मला फसविले आहे. यासंदर्भात न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार आमदार कारेमोरे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने 15 जानेवारीपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. आता पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, त्यांच्याविरुद्ध आमची लढाई सुरू होईल, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.