ETV Bharat / state

घराबाहेर निघताना मास्क घालणे बंधनकारक, जिल्हाधिकारी यांचे आदेश

जिल्ह्यात घराबाहेर निघणाऱ्या प्रत्येकाला आता मास्क घालणे बंधनकारक झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी तसे आदेश काढले आहेत.

mask
घराबाहेर निघताना मास्क घालणे बंधनकारक
author img

By

Published : Apr 11, 2020, 9:24 AM IST

भंडारा - जिल्ह्यात घराबाहेर निघणाऱ्या प्रत्येकाला आता मास्क घालणे बंधनकारक झाले आहे. जिल्हाधिकारी यांनी तसे आदेश काढले असून मास्क न घालणाऱ्या व्यक्तीवर नगरपालिकेतर्फे 150 रुपयांचा दंड आकाराला जाणार आहे. या आदेशानंतर जिल्ह्यातील नागरिक मास्क घालूनच कामानिमित्त घराबाहेर पडत आहेत.

घराबाहेर निघताना मास्क घालणे बंधनकारक
लॉकडाऊन दरम्यान कामानिमित्त घराबाहरे पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने, तसेच जीवनावश्यक वस्तूंचे विक्रेते, अत्यावशक्य सेवा देणारे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क लावणे बंधनकारक केले आहे.

ज्या लोकांना हे मास्क कशासाठी आहे, यामुळे प्रादुर्भाव कसा थांबवता येईल यांची योग्य माहिती नसते. अशा लोकांना सुरुवातीला नगरपालिकेचे कर्मचारी मास्कचे फायदे सांगून मास्क घालण्यास सांगत आहेत. जर सांगूनही लोक ऐकत नसतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

जिल्ह्यात सध्या तरी कोणीही कोरोनाग्रस्त आढळला नाही. मात्र, आज ज्या पद्धतीचे रुग्ण महाराष्ट्रात सापडत आहेत हे लक्षात घेता तोंडावर मास्क न घालता शिकण्यातून किंवा बोलताना उडणाऱ्या थुंकीतून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून प्रत्येकाने स्वतःची काळजी घेण्यासाठी मास्क नक्की वापरावे. या मुळे स्वतःही सुरक्षित राहता येईल आणि दुसऱ्यांनासुद्धा सुरक्षित ठेवता येईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.