ETV Bharat / state

Lumpy Disease : लंपी रोग केंद्र शासनाने मुद्दाम विदेशातून आणला, नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर आरोप

केंद्राने ( Central government ) विदेशातील विदेशातील लंपी रोग ( Lumpy disease ) भारतात आणल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी केला आहे.

author img

By

Published : Oct 3, 2022, 6:46 PM IST

Updated : Oct 3, 2022, 7:33 PM IST

Nana Patole
नाना पटोले

भंडारा : शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासाठीच केंद्राने ( Central government ) विदेशातील लंपी रोग ( Lumpy disease ) भारतात आणल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress state president Nana Patole ) यांनी केला आहे. विदेशातील चित्ते आणल्यामुळे महागाई कमी होणार नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही. मात्र अशा असतानाही या विदेशी प्राण्यांना आणून लंपि सारखा रोग आपल्या देशात आणण्याचा महापाप केंद्र शासनाने ( Nana Patole allegations against central government ) केल्याचा आरोप त्यांनी आज भंडारा येथे पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.

नाना पटोले

धान खरेदी केंद्राची चौकशी करा - जिल्हा नियोजन समितीची बैठक आटल्यानंतर नाना पटोले हे माध्यमांशी बोलत असताना शासनाने शेतकऱ्यांना मागील वर्षीचे सातशे रुपये बोनस, यावर्षी हजार रुपये बोनस असा एकंदरीत सतराशे रुपयेचा बोनस द्यावा अशी, मागणी केली. भंडारा जिल्ह्यात झालेल्या शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राची योग्य ती चौकशी करून दोषी केंद्रांवर, अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करा - केंद्र शासन हे शेतकऱ्यांबाबत गंभीर नाही आजपर्यंत देशात लंपी सारख्या आजारामुळे जनावरांचा मृत्यू ( Nana Patole accuses central government ) झाला. आत्ताच हा विदेशी रोग आपल्या देशात का आला? त्याच्यावर केंद्र शासनाकडे कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाही. या रोगामुळे ज्या शेतकऱ्यांचा गोधन मरत आहे त्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच लंपीचा आजार हा केंद्राने मुद्दाम विदेशातून आणला असल्याचाही घनाघाती आरोप त्यांनी यावेळेस केला आहे. विदेशातून चित्ता आल्यामुळे देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न मिटणार नाही, महागाईचे प्रश्न मिटणार नाहीत, बेरोजगारींचे प्रश्न मिटणार नाही पण असं असतानाही मोठ्या प्रमाणात वाजागाचा करीत चित्ता आणले.

Last Updated : Oct 3, 2022, 7:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.