भंडारा- भंडारा-गोंदिया विधानपरिषदचे आमदार परिणय फुके यांना नुकतेच राज्यमंत्री पद मिळाले. तसेच शुक्रवारी रात्री त्यांना भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली. पालकमंत्री झाल्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच फुके भंडारा जिल्ह्यात आले होते. यानिमित्ताने विविध ठिकाणी त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
परिणय फुके यांना सार्वजनिक बांधकाम, वने, आदिवासी विकास राज्यमंत्री पद तसेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याने जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. सुरुवातीला भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरील पहिल्या गावात त्यांचे स्वागत केले गेले. नंतर विविध ठिकाणी स्वागत करीत शहरात त्यांचे आगमन झाले. त्यांनी त्रिमूर्ती चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण केले. नंतर गांधी चौकात फटाके फोडून, ढोल ताश्याने त्यांचे स्वागत केले गेले.
पालकमंत्री परिणय फुके यांचे जिल्ह्यात जंगी स्वागत - minister
परिणय फुके यांना वने, सार्वजनिक बांधकाम व आदिवासी विकास राज्यमंत्री पद तसेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याने जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
भंडारा- भंडारा-गोंदिया विधानपरिषदचे आमदार परिणय फुके यांना नुकतेच राज्यमंत्री पद मिळाले. तसेच शुक्रवारी रात्री त्यांना भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी सोपवण्यात आली. पालकमंत्री झाल्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच फुके भंडारा जिल्ह्यात आले होते. यानिमित्ताने विविध ठिकाणी त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
परिणय फुके यांना सार्वजनिक बांधकाम, वने, आदिवासी विकास राज्यमंत्री पद तसेच भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्याने जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. सुरुवातीला भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरील पहिल्या गावात त्यांचे स्वागत केले गेले. नंतर विविध ठिकाणी स्वागत करीत शहरात त्यांचे आगमन झाले. त्यांनी त्रिमूर्ती चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण केले. नंतर गांधी चौकात फटाके फोडून, ढोल ताश्याने त्यांचे स्वागत केले गेले.
Body:सार्वजनिक बांधकाम, वने आदिवासी विकास राज्यमंत्री परिणय फुके यांचे राज्य मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शनिवारी जिल्ह्यात आगमन होणार होते त्याच्याच शुक्रवारी रात्री त्यांना भंडारा जिल्ह्याच्या पालक मंत्री पदही देण्यात आले त्यामुळे शनिवारी त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली. सुरवातीला भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरील पहिल्या गावात त्यांचे स्वागत केले गेले नंतर विविध ठिकाणी स्वागत करीत शहरात त्यांचे आगमन झाले, त्रिमूर्ती चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण केले नंतर गांधी चौकात फटाके फोडून, ढोल ताश्याने त्यांचे स्वागत केले गेले गांधी जी च्या प्रतिमेला हार चढविल्यानंतर नगर परिषदच्या नगर सेवकांनी नगराध्यक्ष व खासदार असलेल्या सुनील मेंढेनी त्यांचा पुष्गुच्छ देऊन स्वागत केले, या नंतर भाजपा च्या सदस्य नोंदणी कार्यक्रमांत त्यांचा राज्यमंत्री आणि पालक मंत्री म्हणून स्वागत केला गेला. परिणय फुके यांचा कार्यकाळ अगदी अल्पवाढीचा असला तरी त्यांच्यामुळें भंडारा जिल्ह्यात भाजपा कार्यकर्त्यां मध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे.
या नंतर पत्रकार परिषदेत बोलतांना त्यानी सांगितले की येणाऱ्या काळात वनांचे विकास करून त्यामाध्यमातून जिल्ह्यात रोजगार निर्मिती करण्याचे मानस आहे. आणि नागझिरा अभयारण्यात पर्यटकांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने तळोबाच्या धर्तीवर त्याचा विकास करण्याचे प्रयत्न राहील या 5 वाघीण या जंगलात बाहेरून आणण्याचा प्रस्ताव ठेवला आसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढच्या काही दिवसात बरेच बदल जिल्ह्याला पाहायला मिळणार असल्याचे संकेत त्यांनी दिल्याने नेमके कोणते बदल होणार आहे याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
Conclusion: