ETV Bharat / state

भंडाऱ्यात दुचाकीसह ट्रकच्या चाकाखाली गेल्याने युवतीचा जागीच मृत्यू - tumsar taluka bhandara news

तुमसर तालुक्यातील साखळी गावातील रस्त्यावर ट्रक आणि दुचाकी अपघातात ट्रक खाली येऊन एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अन्य दोन महिला जखमी झाल्या आहेत.

girl died after went under wheel of truck in tumsar taluka bhandara
भंडाऱ्यात दुचाकीसह ट्रकच्या चाकाखाली गेल्याने युवतीचा जागीच मृत्यू
author img

By

Published : Aug 1, 2020, 5:41 AM IST

भंडारा - तुमसर तालुक्यातील साखळी गावातील रस्त्यावर ट्रक आणि दुचाकी अपघातात ट्रक खाली येऊन एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अन्य दोन महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेमध्ये तरुणीच्या दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. खुशबू रतनलाल पारधी (23 रा. चिचोली) असे मृत तरुणीचे नाव आहे.

खुशबू ही तुमसर येथून तिच्या दुचाकीने (एम.एच. 49 ए 8355) विदेश्वरी भारत ठाकूर (28) आणि तिची वहिनी रेखा पारधी यांच्यासह चिचोली गावाला परत जात होती. साखळी गावाजवळ पोहोचताच अचानक एक म्हैस समोर आल्याने खुशबूचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव ट्रक (क्रमांक सी.बी. 04 एल. एम. 5817) चाकाखाली ती गेली. ट्रक चालकाने तिला विचावण्याचा प्रयत्न केला मात्र ट्रकच्या चाकाखाली दुचाकी आणि खुशबू दोघेही फसले. त्यामुळे काही मीटर अंतरावर फरफटत गेल्याने खुशबूच्या डोक्याला जबर दुखापत झाली. याच तिचा जागीच मृत्यू झाला. तर, विद्वेश्वरी ठाकूर आणि रेखा पारधी या दोघी जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी तुमसर रुग्णालयात भरती करण्यात आले.

हेही वाचा - औरंगाबाद तालुक्यात पाच तरुणांचा तलावात बुडून मृत्यू

घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. घटनेची पंचनामा करून खुशबूचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. तर चालकाला अटक करण्यात आली आहे. मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाल्याने वाहतूक कमी झाली. त्यामुळे अपघातही कमी होत होते. मात्र, आता पुन्हा लोक घराबाहेर निघत असल्याने अपघात वाढत आहेत. तसेच या अपघाताने मोकाट जनावरांची समस्या पुन्हा समोर आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.