भंडारा - शहरातील बस स्थानकाच्या शेजारी असलेल्या सनी प्लाजा इमारतीच्या मीटर खोलीत शॉट सर्किटने आग लागली. एक तासाच्या प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले आहे. मात्र, यात इलेक्ट्रिक मीटर खोली जळून खाक झाली आहे.
हेही वाचा- COVID-19: महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, सर्वोच्च न्यायालयात जनहितयाचिका
शहरातील सनी प्लाझा ही व्यावसायिक इमारत असून याठिकाणी दुकाने, कार्यालय, रुग्णालय आहेत. यासर्वांचे मीटर इमारतीतील एका खोलीत आहेत. दुपारी 1 वाजताच्या सुमारास शाॅर्ट सर्किटने याठिकाणी आग लागली. सुरुवातीला कमी प्रमाणात असलेली ही आग नंतर वाढत गेली. घटनेची माहिती अग्निशामक दलास मिळताच भंडारा नगर परिषदेचे अग्निशामक वाहन घटनास्थळावर पोहोचले.
1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले आहे. आग लागलेल्या ठिकाणाच्या शेजारी एका हाॅटेलचे किचन असून यात सिलेंडर होते. त्यामुळे सुदैवाने आग तिथपर्यंत पोहोचली नाही. मात्र, या आगीत मीटर खोलीचे मोठे नुकसान झाले आहे.