भंडारा - मोहाडी तालुक्यातील मोहगाव (देवी) येथील गजानन काळे, यांच्या कुटुंबात एकूण 19 सदस्य आहेत. गजानन काळे यांना त्यांच्या कुटुंबीयांनी मागील 60 वर्षांपासून सुरू असलेल्या शेतीच्या कामातून निवृत्ती दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती म्हणजे सोहळा असतो, मग शेतकऱ्याची निवृत्ती तेवढ्याच उत्साहात साजरी का करू नये? याच कल्पनेतून काळे यांच्या मुलांनी वडिलांच्या अहोरात्र कष्ट करून केलेल्या शेतीच्या सेवेचा सन्मान करायचे ठरवले. त्यामुळे यावेळी त्यांचा नुसता सेवानिवृत्तीचा सोहळा झाला असे नाही, तर ढोल-ताशांच्या गजरात आप्तेष्टांनी वाजत-गाजत सजवलेल्या बैलगाडीवरून मिरवणूक काढण्यात आली.
हेही वाचा... नो टू सिंगल यूज प्लास्टिक : अन्य राज्यांसाठी मॉडेल बनत आहे अंबिकापूर 'कचरा व्यवस्थापन'
आजपर्यंत आपण अनेक शासकीय कर्मचाऱ्यांचा सेवा निवृत्तीचा सोहळा पाहिला असेल मात्र मोहाडी तालुक्यात एका शेतकऱ्याच्या निवृत्ती सोहळा साजरा करण्यात आला. बैलगाडीवर या शेतकऱ्यांची गावात वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. 60 वर्षांच्या दीर्घ काळानंतर 79 व्या वर्षी त्यांना शेतीतून निवृत्ती देण्यात आली. गजानन काळे असे या गृहस्थाचे नाव आहे.
हेही वाचा... जनआक्रोश: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात धगधगताहेत 'ही' शहरं
कदाचित एखाद्या शेतकऱ्याला शेतीच्या कामातून निवृत्ती देण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच सोहळा असेल. एखाद्या शेतकऱ्याच्या वृद्धापकाळात या पेक्षा मोठा आनंद तो काय असणार. जणू त्याच्या आयुष्यभराच्या कष्टाचेच चीज झाले असावे.
हेही वाचा... IPL 2020: 'काई पो चे'च्या कलाकाराची मुंबई इंडियन्समध्ये एन्ट्री, २० लाखाची लागली बोली
80 वर्षीय गजानन काळे यांनी, मागील 60 वर्षे आपण शेतीमध्ये पूर्णतः गुंतून गेलो होतो. आयुष्यात अनेक चढ-उतार आले पण कधीही डगमगलो नाही. निसर्गाशी दोन हात करण्याची हिंमत वाढतच गेली. आयुष्यभर मी शेतीत राबलो, अजूनही शेतीपासून दूर जाण्याची मनात इच्छा होत नाही. मात्र, एकीकडे मुले हा सर्व कारभार सांभाळणार म्हणून आनंद आणि दुसरीकडे आता शेतीतून निवृत्ती स्वीकारल्यामुळे दुःख होत असल्याचे, गजानन काळे यांनी सांगितले.