भंडारा - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी मास वापरावे आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थित समारंभ पार पाडावे, असे महाराष्ट्रातील मंत्री सांगताना दिसत आहेत. मात्र स्वतः ते हे नियम पडतात का? असा प्रश्न बरेचदा नागरिकांना पडतो. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 'बोले तसा चाले' या म्हणी प्रमाणे त्यांच्या मुलाच्या लग्नात अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मास्क वापरला, एवढंच नाही तर वधू-वर यांनी सुद्धा मास्क लावूनच लग्न पार पाडले.
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या मुलाचा लग्न सोहळा भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे पार पडला. ऊर्जा मंत्री असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मंत्री, नेते मंडळी, कार्यकर्ते आणि नातेवाईक यांची उपस्थिती राहील, अशी अपेक्षा होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोजक्याच नातेवाईक आणि मित्रमंडळीच्या हजेरीत हा लग्नसोहळा पार पडला. नितीन राऊत त्यांच्यासह त्यांचे जिवलग मित्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश चतुर्वेदी आणि भाजपाचे विधान परिषद आमदार परिणय फुके, हे दोन नेते नागपूर वरून आले होते.
मास्क घालूनच लग्न लावले-
नितीन राऊत यांनी एकदा घातलेला मास्क हा शेवटपर्यंत काढला नाही. एवढेच नाही तर वधू-वरांनी सुद्धा मास्क लावूनच हा लग्नसोहळा पार पाडला. लग्न सोहळ्यादरम्यान बरेचदा मास्क व्यवस्थित वापरा, ज्यांनी वापरला नसेल त्यांनी लगेच मास्क घाला, अशा सूचना दिल्या जात होत्या.
स्वागत समारोह रद्द-
लग्नानंतर स्वागत समारोह होता. मात्र कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता स्वागत समारंभाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
हेही वाचा- दिलासा नाहीच, आज पुन्हा 6281 नवे रुग्ण; अमरावतीत मुंबईपेक्षा अधिक बाधित