ETV Bharat / state

पावसा अभावी परे करपले, नाना पटोले यांची दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मागील दहा-बारा दिवसापासून पाऊस येत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाच्या या लहरीपणाचा फटका शेतकऱ्याला बसून त्याचे परे करपत आहेत.नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या शेतीवर जाऊन पऱ्यांची पाहणी केली.

author img

By

Published : Jul 23, 2019, 8:04 AM IST

Updated : Jul 23, 2019, 3:15 PM IST

नाना पटोले

भंडारा- मागील दहा-बारा दिवसापासून पाऊस येत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाच्या या लहरीपणाचा फटका शेतकऱ्याला बसून त्याचे परे (लहान रोपटे) करपत आहेत. नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या शेतीवर जाऊन पऱ्यांची पाहणी केली. जिल्ह्याची स्थिती अतिशय भयावह असून मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ घोषित करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच पंचवीस हजार रुपये एकरी शेतकऱ्यांना मदत द्यावी अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.

पावसा अभावी परे करपले, नाना पटोले यांची दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

30 जून पासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी धान्याची पेरणी केली. परे मोठे ही झालेत. मात्र मागील काही दिवसांपासून पावसाचा एक थेंबही पडला नसल्याने शेतकरी चिंतातुर झालेला आहे. कारण शेतातील परे आता करपत चाललेले आहेत. ज्या लोकांकडे सिंचनाची व्यवस्था आहे. ते शेतकरी परे जगवतील मात्र जे निसर्गावर अवलंबून आहेत. असे शेतकरी मात्र वरुण राजाला विनंती करीत आहेत. पुढच्या दोन दिवसांमध्ये जर पाऊस झाला नाही. तर बहुतेक शेतकऱ्यांचे परेल हे पूर्णपणे करपून जातील.

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 52 टक्के पाऊस पडलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे. शेतीची नेमकी परिस्थिती पाहण्यासाठी नाना पटोले यांनी शेतात जाऊन शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुष्काळ घोषित करावा अशी मागणी करत एकरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.

तसेच कर्जमाफीची अंमलबजावणी 100% करावी, विद्युत पुरवठा 24 तास करावा, विद्यार्थ्यांची फीस माफ करावी. या मागण्या त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केल्या. या संदर्भात निवेदन मुख्यमंत्र्यांना देऊ असे यावेळी नाना पाटील यांनी सांगितले.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. हवामान खात्याने दिलेला अंदाज जर खरा ठरला. तर शेतकऱ्याला आणि पर्‍यांना एक नवीन जीवन मिळेल. अन्यथा परे पूर्णपणे करपतील आणि शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होईल. त्यामुळे पुढचे दोन दिवस शेतकऱ्यांचे नजरा वरून राज्याकडे राहतील.

Intro:ANC : मागील दहा-बारा दिवसापासून पाऊस येत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाच्या या लहरीपणाचा फटका शेतकऱ्याला बसून त्याचे परे करपत आहेत. अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या शेतीवर जाऊन पऱ्यांची पाहणी केली जिल्ह्याची स्थिती अतिशय भयावह असून मुख्यमंत्र्यांनी दुष्काळ घोषित करावा अशी मागणी त्यांनी केली, तसेच पंचवीस हजार रुपये एकरी शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Body:30 जून पासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी धान्याची पेरणी केली परे मोठे ही झालेत मात्र मागील काही दिवसांपासून पावसाचा एक थेंबही बरसला नसल्याने शेतकरी चिंतातुर झालेला आहे कारण शेतातील परे आता करपत चाललेले आहेत ज्या लोकांकडे सिंचनाची व्यवस्था आहे शेतकरी परे जगवती मात्र जे निसर्गावर अवलंबून आहेत अशी शेतकरी मात्र वरुण राजाला बरसण्याची विनंती करीत आहेत पुढच्या दोन दिवसांमध्ये जर पाऊस बरसला नाही तर बहुतेक शेतकऱ्यांचे परेल हे पूर्णपणे करपून जातील.
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 52 टक्के पाऊस पडलेला आहे त्यामुळ जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरले आहे शेतीची नेमकी परिस्थिती पाहण्यासाठी आज अखिल भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी शेतात जाऊन शेतीची पाहणी केली शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुष्काळ घोषित करावी अशी मागणी करत एकरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.
तसेच कर्जमाफी ची अंमलबजावणी 100% करावी विद्युत पुरवठा 24 तास करावा विद्यार्थ्यांची फीस माफ करावी या मागण्या त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करू आणि या संदर्भात निवेदन मुख्यमंत्र्यांना देऊ असे यावेळी नाना पाटील यांनी सांगितले.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे हवामान खात्याने दिलेल्या अंदाज जर खरा ठरला तर शेतकऱ्याला आणि पर्‍यांना एक नवीन जीवन मिळेल अन्यथा परे पूर्णपणे करपतील आणि शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होईल त्यामुळे पुढचे दोन दिवस शेतकऱ्यांचे नजरा वरून राज्याकडे राहतील.

Conclusion:
Last Updated : Jul 23, 2019, 3:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.