ETV Bharat / state

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान, हजारो क्विंटल धान भिजले - पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

गुरुवारी पावसाने सकाळी दहा वाजेपासून हजेरी लावली. यात शासकीय धान्य खरेदी केंद्रामध्ये विक्रीसाठी नेलेले धान भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान
author img

By

Published : Jan 3, 2020, 12:45 AM IST

भंडारा - पूर्व विदर्भात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. भंडारा जिल्ह्यातदेखील 31 डिसेंबरपासून अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे. सतत तीन दिवस कमी-जास्त स्वरूपाचा पाऊस संपूर्ण जिल्ह्यात पडला आहे. तर, गुरुवारी पावसाने सकाळी दहा वाजेपासून हजेरी लावली. यात शासकीय धान्य खरेदी केंद्रामध्ये विक्रीसाठी नेलेले धान भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दुसरीकडे गोडाऊन संपूर्ण भरलेले असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचे धान खरेदी करू शकत नसल्याने धान उघड्यावर असल्याचे सेवा सहकारी संस्थेचे व्यवस्थापक सांगत आहेत. यावर्षी शासनाने धानाला सातशे रुपये बोनस जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांनी धान्य विक्रीसाठी आधारभूत धान खरेदी केंद्राकडे धाव घेतली. 1 हजार 815 रुपये हमीभाव आणि सातशे रुपये बोनस असे पंचवीसशे रुपये प्रतिक्विंटल दर पडत असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या ठोकळ धान्यासह बारीक धान्यही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर विकण्यासाठी आणले. त्यामुळे, संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांचे गोदाम पूर्णपणे भरले आहेत.

मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या मालाची आवक इतकी जास्त आहे, की संपूर्ण खरिपात जेवढी खरेदी एक धान खरेदी केंद्र करत असे तेवढी खरेदी या दीड महिन्याच्या कालावधीत झाली आहे. अशात पुढील तीन महिने शेतकरी धान्य विक्रीसाठी आणणार आहेत, त्यामुळे या दुप्पट आवक मालाला ठेवण्यासाठी संस्थांकडे गोडाऊन उरले नाही. शासनाने हे खरेदी केलेले धान तातडीने मिलिग करण्यासाठी उचलायला हवे होते. मात्र, अजूनपर्यंत ते उचलले गेले नसल्यामुळे शेतकऱ्यांचे धान उघड्यावर ठेवले गेले आहे. त्यातच अवकाळी पाऊस बरसला आणि शेतकऱ्यांचे उघड्यावर ठेवलेले धान ओले झाले.

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांचे धान वाचवण्यासाठी ताडपत्र चा उपयोग केला खरा, मात्र सर्वात खाली असलेल्या धानाच्या पोत्यांना वाचवणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे, हे हजारो क्विंटल ओले झालेले धान खरेदी केंद्रावर घेतली जाणार नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.

Intro:Anc : पूर्व विदर्भात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे भंडारा जिल्ह्यात ही 31 डिसेंबर पासून या अवकाळी पावसाचे आगमन झाले सतत तीन दिवस कमी-जास्त स्वरूपाचा पाऊस संपूर्ण जिल्ह्यात पडत राहिला मात्र गुरुवारी तर पावसाने सकाळी दहा वाजेपासून जी हजेरी लावली ती दुपारी तीन वाजे पर्यंत कधी मध्यम स्वरूपाचा तर कधी हलक्या स्वरूपाचा पाऊस सतत बरसत राहिला शासकीय धान्य खरेदी केंद्रामध्ये विक्रीसाठी नेलेला धान या पावसात भिजल्याने हजारो शेतकऱ्यांचा नुकसान झाला आहे तर दुसरीकडे गोडाऊन फुल असल्यामुळे आम्ही शेतकऱ्यांचे धान खरेदी करू शकत नाही त्यामुळे हे धान उघड्यावर आहेत असे सेवा सहकारी संस्थेच व्यवस्थापक सांगत आहेत.

Body:यावर्षी शासनाने धानाला सातशे रुपये बोनस जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांनी आपले धान्य विक्रीसाठी आधारभूत धान खरेदी केंद्र कडे धाव घेतली आहे. 1815 रुपये रुपये हमीभाव आणि सातशे रुपये बोनस असे पंचवीस शे रुपये प्रतिक्विंटल दर पडत असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेला ठोकळ धान्यासह बारीक धान्यही शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर विकण्यासाठी आणले त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांचे गोदाम पूर्णपणे फुल झालेले आहेत.
मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धान खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या मालाची आवक इतकी जास्त आहे की संपूर्ण खरिपात जेवढी खरेदी एक धान खरेदी केंद्र करत असे तेवढी खरेदी या दीड महिन्याच्या कालावधीत झाली आहे त्यामुळे पुढच्या तीन महिने अजूनही शेतकरी धान्य विक्रीसाठी आणणार त्यामुळे या दुप्पट आवक मालाला गोडाउन मध्ये ठेवण्यासाठी संस्थांकडे गोडाऊन उरले नाहीत शासनाने हे खरेदी केलेले धान तातडीने मिलिग करण्यासाठी उचलायला हवे होते मात्र अजून पर्यंत ते उचलले गेले नसल्यामुळे शेतकऱ्यांचे धान उघड्यावर ठेवले गेले आहेत.
संपूर्ण जिल्ह्यात हजारो क्विंटल धान हा गोडाऊन फुल झाल्यामुळे उघड्यावर ठेवला गेलेला आहे त्यातच अवकाळी पाऊस बरसला आणि शेतकऱ्यांचा उघड्यावर ठेवलेला धान ओला झाला बऱ्याच शेतकऱ्यांनी त्यांचा धान वाचवण्यासाठी ताडपत्री चा उपयोग केला खरा, मात्र सर्वात खाली असलेले धानच्या पोत्याना वाचवणं त्यांना शक्य झालं नाही त्यामुळे हे हजारो लाखो क्विंटल ओले झालेले धान खरेदी केंद्रांवर घेतली जाणार नसल्याने शेतकऱ्यांचा हा मोठा नुकसान होणार आहे यापुढे अशा पद्धतीचा शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने यथा शीघ्र धान खरेदी केंद्रावरील धानाची उचल करून त्याला मिलिग साठी पाठवणे हे गरजेचे आहे.
बाईट : नामदेव हजारे, शेतकरी, खमारी
रामकृष्ण गायधने, व्यवस्थापक, खरेदी संस्था, बेलाटी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.