भंडारा - साकोली विधानसभा क्षेत्राचे भाजप उमेदवार परिणय फुके आणि काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये रात्री उशिरा हाणामारी झाली. या हल्ल्यात नाना पटोले यांचा पुतण्या जितेंद्र पटोले गंभीर व एक त्यांच्या सहकारी जखमी झाला आहे. फुके समर्थक लिफाफ्यात भरून पैसे वाटत असल्याने नाना पटोले यांच्या पुतण्याने हटकल्याने झालेल्या वादाचे हाणामारीत रूपांतर झाल्याचे त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी 17 लाख 74 हजार रुपयाची रोकड एका गाडीतून जप्त केली असून परिणय फुके, दीपक लोहिया व इतर 30 लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हेही वाचा -मुख्य मुद्द्यावरून लक्ष भटकवण्यासाठीच कलम ३७० चा प्रचार; मुख्यमंत्री बघेल यांचे टिकास्त्र
तर परिणय फुके यांच्यातर्फे पोलिसात तक्रार दिली जात आहे. त्यांच्या मते नाना पटोले यांच्या पुतण्यांनी आणि नागपूरवरून आणलेल्या गुंडांनी परिणय फुके यांच्या लहान भावाचा अपहरण करून मारहाण केली आहे. दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यासर्व प्रकारानंतर साकोली विधानसभेचा वातावरण चांगलाच पेटला असून परिसरात मोठा तणाव निर्माण झाले आहे, पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे.
हेही वाचा - आता भाजपला 'खामोश' म्हणण्याची वेळ आली आहे - शत्रुघ्न सिन्हा