भंडारा- जिल्हा सामान्य रुग्णालयात दहा नवजात बालकांचा करुण अंत झाला. आठ दिवसानंतरही त्यांच्या कुटुंबाला न्याय न मिळाल्याचा आरोप करत भाजपने शनिवारपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले हे आंदोलन 25 जानेवारीपर्यंत राहणार आहे. यानंतरही कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा भाजने इशारा दिला आहे.
खासदार सुनील मेंढे यांच्या नेतृत्वात भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. खासदार सुनील मेंढे म्हणाले की,
सध्या राज्य सरकारने नेमलेल्या चौकशीत सरकारी अधिकारी आहेत. त्यामुळे या घटनेची निष्पक्ष चौकशी होणार नाही. सरकार सत्य लपवीत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, ही प्रमुख मागणी आहे.
आठ दिवसानंतरही कोणावरही कारवाई नाही-
हेही वाचा-Bhandara Hospital Fire : पंतप्रधान मोदी, शाह, गांधींसह मान्यवरांनी व्यक्त केली हळहळ
पीडित कुटुंबाला दहा लाख रुपये देण्याची मागणी-
राज्य सरकारने पीडित कुटुंबाला प्रत्येकी पाच लाख रुपये दिले आहेत. प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणीही भाजपने केली आहे.
हेही वाचा-भंडारा : रुग्णालयातील आगीत १० बालकांचा मृत्यू; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिले चौकशीचे आदेश
काय घडली होती घटना-
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. शनिवारी (10 जानेवारी) मध्यरात्री सुमारे दोन वाजता आग लागली. एसएनसीयूमध्ये एकूण 17 नवजात बालके होती. त्यापैकी 7 बालकांना वाचविण्यात यश आले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले. तसेच त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देणार असल्याचे देखील सांगितले. या घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारी रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.