ETV Bharat / state

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच भाजप कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न - भंडारा

भाजपचे माजी नगरसेवक आणि निष्ठावंत कार्यकर्ते अरुण भेदे यांनी जाहीर कार्यक्रमात मंचावर जाऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

आत्मदहन करण्याचा प्रयत्न
author img

By

Published : Feb 23, 2019, 12:02 AM IST

भंडारा - भाजपचे माजी नगरसेवक आणि निष्ठावंत कार्यकर्ते अरुण भेदे यांनी जाहीर कार्यक्रमात मंचावर जाऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. भाजपने आयोजीत केलेल्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमा दरम्यान ही घटना घडली. या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, इतर आमदार आणि नगराध्यक्ष उपस्थित होते. या घटनेमुळे मंचावर काही काळ मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता.

आमदार परिणय फुके, उपाध्यक्ष अशोक गुंड आणि आणि पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या सतर्कतेमुळे ही अनुचित घटना टळली. अरुण भेदे मागील ३० वर्षांपासून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. तसेच ते माजी नगरसेवक ही होते. सध्या भाजपच्या स्वच्छ भारत अभियानाचे ते जिल्हा अध्यक्ष आहेत. त्यांच्या घरासमोरील शासकीय जागेवर अवैध बांधकाम सुरू आहे. ते बांधकाम थांबवून तोडण्याची मागणी मागील कित्येक दिवसांपासून सुरू आहे. बांधकाम अवैध असल्याचे पत्रही मुख्याधिकारी यांना दिले आहे. मात्र, नगराध्यक्षांच्या प्रभावामुळे ते अवैध बांधकाम पाडले जात नाही. या विषयी त्यांनी पालक मंत्र्यांनाही सांगितले होते. मात्र, कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी आज कार्यक्रम सुरू असताना पालकमंत्र्यांना निवेदन देत अंगावर रॉकेल टाकून आत्मदाहनाचा प्रयत्न केला.

प्रसंगावधन राखत त्यांना आत्मदहन करण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर आमदार चरण वाघमारे यांनी त्यांची समजूत काढली. अरुण भेदे राहत असलेल्या टाकळी क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १ मध्ये शासनाच्या जागेवर भाजपच्या एका नगरसेविकेच्या नातेवाईकांच्या घराचे बांधकाम सुरू आहे, बांधकाम सुरू करण्याअगोदर त्या ठिकाणी ज्योतीबा फुले यांचा पुतळा होता.

या जागेवर भाजपच्या नगरसेविकेच्या नातेवाईकांनी घर बांधण्यास सुरुवात केली. तेव्हा पासून या विषयी माळी समाज्याच्या वतीने वेळोवेळी तक्रार करण्यात आली. बांधकाम अनधिकृत असल्याचे पत्रही मुख्याधिकारी यांनी दिले. मात्र, भाजपची नगरसेविका ही नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्या गटातील असल्याने या बांधकामाला उभय देण्यात येत असल्याचे बोलले जात नाही.

undefined

ज्योतिबा फुलेंचा पुतळा अनाधिकृत असल्याची तक्रार होताच त्याच्यावर कारवाई करता. मात्र, त्याच जागेवर संपूर्ण घराचे बांधकाम होऊनही जर तुम्ही कारवाई करत नसाल तर शेवटी मला माझ्या समाजासाठी माझ्या देशासाठी आत्मदहन करावे लागेल, मी भाजपसाठी ३० वर्ष दिले आहेत जर माझ्या सारख्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्याचे ऐकले जात नसेल तर इतर नागरिकांचे काय ऐकणार, असा सवाल या वेळी अरुण भेदे यांनी केला.

अरुण भेदे यांनी केलेला या आत्मदहनाच्या प्रयत्नांची चर्चा सर्वत्र पसरल्याने भंडारा नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षांची सुरू असलेली हुकूमशाही आणि नगर परिषदेमध्ये पडलेल्या २ गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. या घटनेनंतर तरी हे अवैध बांधकाम पाडले जाते की नाही याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.

Intro:video whatsapp वर पाठविले आहेत कृपया बातमी घ्यावी

Anc : बीजेपी ने मोठ्या थाटामाटात नवीन पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवला होता या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि इतरही आमदार नगराध्यक्ष उपस्थित होते कार्यक्रम सुरू असतानाच मंचावर बीजेपी चे माजी नगरसेवक आणि निष्ठावंत कार्यकर्ते असलेले अरुण भेद यांनी मंचावर येऊन अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने मंचावर काही काळ मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता मात्र आमदार परिणय फुके उपाध्यक्ष अशोक गुंड आणि आणि पोलिस अधीक्षक विनिता साहू यांच्यासह यांच्या सतर्कतेमुळे एक अनुचित घटना टाळता आली.

Body:अरुण भेदे मागील तीस वर्षापासून बीजेपी चे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत तसेच ते माजी नगरसेवक ही राहिले आहेत सध्या बीजेपीच्या स्वछ भारत अभियानाचे ते जिल्हा अध्यक्षय आहेत.
त्यांच्या घरासमोरील शासकीय जागेवर अवैध बांधकाम सुरू आहे तो थांबवून तोडण्याची मागणी मागील कित्येक दिवसांपासून सुरू आहे. ते बांधकाम अवैध असल्याचे पत्रही मुख्याधिकारी यांनी दिले आहे मात्र नगराध्यक्षाच्या प्रभावामुळे ते अवैध बांधकाम पाळल्या जात नाही आहे, या विषयी त्यांनी पालक मंत्र्यांनाही सांगितले मात्र कोणीही कार्यवाही करीत नसल्याचे लक्ष्यात आल्यावर त्यांनी आज कार्यक्रम सुरू असतांना पालक मंत्र्यांना निवेदन देत अंगावर रॉकेल टाकून आत्मदाहनाचा प्रयत्न केला.
प्रसंगावधन राखत त्याला पकडून त्याच्या हातातील आग पेटी हिसकावून घेण्यात आली, त्यानंतर आमदार चरण वाघमारे यांनी त्याला घेऊन बसून त्याची समजूत काढण्याचा ही प्रयत्न केला.

अरुण भेंडे राहत असलेल्या टाकळी क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये शासनाच्या जागेवर बिजेपीच्या एका नगर सेविकेच्या नातेवाईकांनी घराचे बांधकाम सुरू केले, बांधकाम सुरू करण्याअगोदर त्या ठिकाणी ज्योतिबा फुले यांचा पुतळा बसविला गेला होता मात्र त्या विरुद्ध तक्रार करताच नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी लगेच पुतळा उचलला.
त्या नंतर त्या जागेवर बिजेपीच्या नगर सेविकेच्या नातेवाईकांनी घरबांधयला सुरुवात केली तेव्हा पासून या विषयी माळी समाज्याच्या वतीने वेळोवेळी तक्रार दिली, त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी ही केली गेली ते बांधकाम अनधिकृत असल्याचे पत्रही मुख्याधिकारी यांनी दिले मात्र घर पूर्णपणे उभा झाला आता केवळ प्लास्टर बाकी राहिला आहे. मात्र त्याला तोडण्याची हिंमत नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी केली नाही कारण ती बीजेपी ची नगर सेविका ही नगराध्यक्ष सुनील मेंढे यांच्या गटातील असल्याने या बांधकामाला उभय देण्यात येत आहे.
तुम्हाला ज्योतिबा फुलेंचा पुतळा हा अनाधिकृत असल्याचे तक्रार होताच त्याच्यावर लगेच त्याच दिवशी कार्यवाही करता मात्र त्याच जागेवर संपूर्ण घराचे बांधकाम होऊनही जर तुम्ही कार्यवाही करत नसाल तर शेवटी मला माझ्या समाजासाठी माझ्या देशासाठी आत्मदहन करावे लागेल, मी बीजेपी साठी 30 वर्ष दिले आहेत जर माझ्या सारख्या निष्ठवंत बीजेपी कार्यकर्यांचे बीजेपी मध्ये ऐकली जात नसेल तर इतर नागरिकांचे काय ऐकणार असा सवाल या वेळी अरुण भेदे हे करीत होते.

अरुण भेदे ने केलेला या आत्मदाहनाचा प्रयत्नाची चर्चा सर्वत्र पसरल्याने भंडारा नगर परिषद मध्ये नगराध्यक्षयची सुरू असलेली हुकूमशाही आणि नगर परिषद मध्ये पडलेल्या दोन गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला, आपल्या बाजूने असलेल्या नगर सेविकेच्या विरुद्ध कार्यवाही न करण्यासाठी जो खटाटोप नगराध्यक्षांनी सुरू ठेवला त्यामुळे एका माजी नगरसेवकाने बीजेपी च्या मंचावर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर तरी हे अवैध बांधकाम पाडले जाते की नाही याकडेच लोकांचे लक्ष लागून आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.