ETV Bharat / state

भंडारा : भीषण अपघात आमदाराच्या भावाचा दुर्दैवी मृत्यू

author img

By

Published : Aug 8, 2020, 9:47 PM IST

मृत रामेश्वर हे आमदार राजू कारेमोरे यांचे लहान बंधू असून एकालरीचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच होते.

अपघात
अपघात

भंडारा - तुमसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू कारेमोरे यांच्या लहान भावाचा अपघाती मृत्यू झाला आहे.

राईस मिलचे दैनंदिन काम आटोपून घरी जात असताना कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू कंटेनरने जोरदार धडक दिली. यात कारचालक रामेश्वर कारेमोरे (४०) यांचा मृत्यू झाला.

मृत रामेश्वर हे आमदार राजू कारेमोरे यांचे लहान बंधू असून एकालरीचे माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच होते. अल्पशा राजकीय जीवनात गावाचा कायापालट करून सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणाऱ्या स्वभावाने त्यांची वेगळी छाप होती. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यूची वार्ता पसरताच त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी एकच गर्दी उसळली होती.

घटना काल रात्री १०.३० च्या दरम्यान वरठी तुमसर राज्य महामार्गावर घडली. या भीषण अपघात कारचा अक्षरशः चुराडा झाला होता. जेसीबीच्या मदतीने कारचालकाला जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले. त्यांना उपचारासाठी भंडारा येथे हलवण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

रामेश्वर कारेमोरे हे राईस मिलचे संचालक होते. वरठी बायपास रस्त्यावर व तुमसर - वरठी राज्यमार्गावर त्यांच्या राईस मिल आहेत. मोहगाव शिवारात असलेल्या राईस मिल परिसरात त्यांचे घर आहे. ते नियमित वरठी येथील बायपास रस्त्यावरील राईस मिलचे काम पाहत होते. राजाभाऊ कारेमोरे आमदार झाल्यापासून या राईस मिलच्या संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे होती.

राईस मिलचे दैनंदिन काम आटोपून नेहमी प्रमाणे कारने घरी जात असताना घरापासून हाकेच्या अंतरावर हा भीषण अपघात घडला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. यात कारच्या समोरील भागाचा पूर्णतः चुराडा झाला होता.

मनमिळावू व लोकांना मदत करण्याच्या स्वभाने ते परिचित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आमदार राजू कारेमोरे यांचा राजकीय वारसा पुढे नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. विधानसभा निवडणुकीत संपूर्ण तालुक्याची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावर घेऊन अपेक्षित यश खेचून आणण्यात मदत केली होती.

राजकीय, सामाजिक व उद्योग क्षेत्रातील मंडळी त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित होती. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ व बहीण असा बराच मोठा आप्तपरिवर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.