ETV Bharat / state

भंडाऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी नियमांचे तिनतेरा

भंडारा शहरातून निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आले, असे दिसत आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या डोळ्यांसमोरच ध्वनी नियमाचे तीन तेरा वाजवल्याचे दिसून आले.

भंडाऱ्यात गणेश विसर्जन मिरवणूकीत ध्वनी नियमांचे तिन तेरा
author img

By

Published : Sep 14, 2019, 10:53 PM IST

भंडारा - शहरातून निघालेल्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मंडळांनी जोरदार ध्वनिप्रदूषण केले. विशेष म्हणजे हे सर्व पोलिसांच्या नजरे समोर सुरू होते, मात्र पोलिसांनी कोणत्याही मंडळांवर कार्यवाही केली नाही.

भंडारा येथील गणेश मंडळांनी तोडलेले वायू प्रदूषणाचे नियम

हेही वाचा... बीडमध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांची २५ किलोमीटरची पायपीट

गणपती स्थापनेच्या अगोदर सर्व गणपती मंडळांनी ध्वनी प्रदूषण टाळावे, अशी सूचना पोलिसांमार्फत दिली गेली होती. मात्र, शनिवारी काही सार्वजनिक गणपती मंडळांनी विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम मोडत मिरवणूका काढल्या. विशेष म्हणजे एका गणपती मंडळाची मिरवणूक ही संवेदनशील भागातून जात असल्याने या मिरवणुकीच्या सभोवताली पोलिसांचा गराडा होता, खुद्द भंडारा पोलीस निरीक्षक हेही उपस्थित होते. मात्र असे असले तरीही पोलिसांना हे ध्वनिप्रदूषण दोत आहे, हे दिसत असतानाही ते रोखले जात नव्हते.

हेही वाचा... भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधात सिल्लेवाडा महिला सरपंचांची पोलिसांत तक्रार​​​​​​​

ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढणे हा नेहमीचा प्रकार मात्र त्यामध्ये कर्कश दहा ते बारा भोंग्याचा आवाज त्रासदायक होता, याची जाणीव ना मंडळाला झाली नाही पोलिसांना.

हेही वाचा... 'सेनेचा रिफायनरीला विरोध नाही, पण प्रदूषणकारी प्रकल्पाला विरोध कायम'​​​​​​​

नदीमध्ये होणाऱ्या प्रदूषण टाळण्यासाठी नगरपरिषदेने पीओपीच्या मूर्ती विक्रीवर बंदी आणली मात्र तरीही काही लोकांनी त्यांची विक्री केली. एकंदरीतच काय गणपती सारखा सण साजरा करताना नागरिक त्यांचे कर्तव्य पार पाडत नाही. आणि ध्वनी प्रदुषण रोखण्याचे कर्तव्य पोलिसही पार पाडत नाही, असेच दिसत आहे. त्यामुळे ज्या पोलिसांनी मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवले नाही, ते मिरवणूक संपल्यावर तरी काही कार्यवाही करतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:ANC : शनिवारी भंडारा शहरातून निघालेल्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून मंडळांनी जोरदार ध्वनिप्रदूषण केले विशेष म्हणजे हे सर्व पोलिसांच्या देखरेखीखाली सुरू होते मात्र पोलिसांनी कोणत्याही मंडळांवर कार्यवाही केली नाही, जणू पोलिसच ध्वनिप्रदूषण करण्यासाठी या मंडळांना संरक्षण देत होते.

Body:गणपती स्थापनाच्या पहिले सर्व गणपती मंडळांना ध्वनी प्रदूषण टाळावे अशी सूचना पोलिसांमार्फत दिली गेली होती मात्र शनिवारी काही सार्वजनिक गणपती मंडळांनी विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस ध्वनी प्रदूषणाचे सर्व नियम मोडत मिरवणूक काढली. विशेष म्हणजे एका गणपती मंडळाची मिरवणूक ही संवेदनशील भागातून जात असल्याने या मिरवणुकीच्या सभोवताल पोलिसांचा गराडा होता खुद्द भंडारा पोलीस निरीक्षक हेही उपस्थित होते मात्र असे असले तरी पोलिसांना हे ध्वनिप्रदूषण ऐकू जात नव्हतं, मिरवणुकीदरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये केवळ यासाठी ही सुरक्षा ठेवण्यात आली होती ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी पोलिसांची नाही का प्रश्न मिरवणूक जात असताना नागरिकांना पळत होता.
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढणे हा नेहमीचा प्रकार मात्र त्यामध्ये कर्कश दहा ते बारा पोग्याचा आवाज हा अतिशय कर्कश होता, मात्र याची जाणीव ना मंडळाला झाली ना पोलिसांना.
नदीमध्ये होणाऱ्या प्रदूषण टाळण्यासाठी नगरपरिषदेने पीओपी च्या मूर्ती विक्रीवर बंदी आणली मात्र तरीही काही लोकांनी त्यांची विक्री केली, काही विक्री करणाऱ्यांवर नगरपालिकेने कारवाई केली. एकंदरीतच काय गणपती सारखा पावन सण साजरा करताना ही नागरिक त्यांचे कर्तव्य पार पाडत नाही, पुढच्यावर्षी बापाला बोलतात आणि पुन्हा निसर्गाला हानी पोहोचेल अशीच कार्य करतात. पुढच्या वर्षी तरी ध्वनिप्रदूषन आणि पीओपीच्या मूर्ती विक्री यावर पूर्णपणे आळा बसावा या साठी सर्व भक्त मिळून प्रयत्न करतील एवढीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
ज्या पोलिसांनी मिरवणुकीदरम्यान ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवले नाही ते पोलीस मिरवणूक संपल्यावर तरी काही कार्यवाही करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.