भंडारा - जिल्ह्यातील पूर परिस्थिती ही मध्य प्रदेशमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे निर्माण झाली आहे. या पुरामध्ये अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीमला बोलवण्यात आले असून त्या अगोदर स्थानिक पोलीस विभाग आणि इतर नागरिकांच्या मदतीने आतापर्यंत अनेक नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. जर मध्य प्रदेशमधील संजय सरोवरचे पाणी सोडले गेले नाही तर ही परिस्थिती लवकरच आटोक्यात येईल, अशी आशादायक माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिली.
दरम्यान, सध्या संजय सरोवरची गेट बंद करण्यात आले आहेत. पण यापुढे हे गेट उघडली गेली तर परिस्थिती अजून वाईट होण्याची शक्यता आहे. तरी सर्व यंत्रणा सज्ज असून त्यानुसार परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी सांगितले. सध्या गोसे धरणाचे सर्व म्हणजे 33 दार साडेचार मीटरने उघडण्यात आली आहेत.
हेही वाचा - मध्य प्रदेशच्या धरणातून पाणी सोडल्याने भंडारा जिल्ह्यात महापूर, अनेक गावे जलमय
हेही वाचा - पोल्ट्रीफार्ममध्ये महापूराचे पाणी शिरल्याने 3500 कोंबड्यांचा मृत्यू, साडेतीन लाखांचे नुकसान