ETV Bharat / state

भंडाऱ्यात कोरोनाबाधिताने रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून घेतली उडी

उपचारासाठी रुग्णाकडून जवळपास एक लाख रुपये घेण्यात आले. मात्र, इतका खर्च करूनही डॉक्टरांकडून योग्य उपचार मिळत नाही. त्यामुळे, कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेतली व स्वत:ला जखमी केले.

रुग्णालय
रुग्णालय
author img

By

Published : Sep 21, 2020, 9:31 PM IST

भंडारा- कोविड रुग्णालयात रुपांतरित करण्यात आलेल्या अशोका हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून एका कोरोना रुग्णाने उडी घेतली आहे. या घटनेत रुग्णाचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याला उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर बोलू असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

माहिती देतान ईटीव्ही भारत प्रतिनिधी

१९ सप्टेंबरला भंडारा शहरातील बाबा मस्तानशाह वॉर्डातील ४५ वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याला उपचाराकरिता अशोका हॉटेल येथील कोरोना सेंटरमध्ये भरती करण्यात आले. उपचारासाठी रुग्णाकडून जवळपास एक लाख रुपये घेण्यात आले. मात्र, इतका खर्च करूनही डॉक्टरांकडून योग्य उपचार मिळला नाही. त्यामुळे, कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेतली व स्वत:ला जखमी केले. रुग्णाला पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे.

शुक्रवारी (११ स्पटेंबर) तुमसर तालुक्यातील एका रुग्णाला डॉक्टरांनी उपचार न दिल्याने त्याचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण ताजे असताना कोरोनाबाधित रुग्णाने कोरोना सेंटरच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेतली. या प्रकरणानंतर जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे. रुग्णाने उडी का घेतली याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, शासकीय रुग्णालयापेक्षा चांगली व्यवस्था आणि उपचार मिळते म्हणून रुग्ण खाजगी रुग्णालयात जातात. मात्र, तेथे देखील जिवावर बेतत असेल, तर प्रशासनाने या विषयी विचार करण्याची गरज आहे.

हेही वाचा- विशेष : 'ज्याला देव मानत होतो, त्या डॉक्टरने पाठ फिरवल्याने माझ्या भावाचा मृत्यू'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.