ETV Bharat / state

Leopard Attacked a Forest Employee: जखमी बिबट्याला वाचवण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यावर बिबट्याचा हल्ला - Leopard attack on forest

अज्ञात ट्रकच्या धडकेत जखमी झालेल्या मादा बिबटवर उपचार करायला गेलेल्या वन कर्मचाऱ्यावर मादा बिबटने हल्ला केला. ( Leopard Attacked a Forest Employee ) यामध्ये वन कर्मचाऱ्याला जखमी केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहघाटा जंगलशिवारातील महाराष्ट्र वनविकास महामंडळ रोपवाटिका जवळ घडली आहे. कृष्णा सानप (34) असे जखमी वनरक्षकाचे नाव आहे.

जखमी बिबट्या
जखमी बिबट्या
author img

By

Published : Jul 27, 2022, 5:49 PM IST

भंडारा - अज्ञात ट्रकच्या धडकेत जखमी झालेल्या मादा बिबटवर उपचार करायला गेलेल्या वन कर्मचाऱ्यावर मादा बिबटने हल्ला केला. यामध्ये वन कर्मचाऱ्याला जखमी केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहघाटा जंगलशिवारातील महाराष्ट्र वनविकास महामंडळ रोपवाटिका जवळ घडली आहे. ( Leopard Attacked a Forest Employee In Bhandara ) कृष्णा सानप (34) असे जखमी वनरक्षकाचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

अज्ञात वाहनाने दिली धडक - मंगळवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 53 वर एक बिबट रस्त्याच्या मधोमध पडला होता. त्यामुळे त्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी बिबट पाहण्यासाठी गर्दी केली. दरम्यान, याची माहिती वन विभागाला मिळताच तात्काळ साकोलीचे सहाय्यक वनरक्षक राठोड आणि लाखनीचे वनरक्षक कृष्णा सानप हे घटनास्थळी पोहचले. बिबट जखमी अवस्थेत पडलेले होते. अज्ञात वाहनांच्या धडकेत जखमी होऊन रोडावर पडलेल्या मादा बिबटाला उपचार करत असतांना मादा बिबट्याने लाखनीचे वनरक्षक कृष्णा सानप (34) यांच्या हल्ला चढवला आणि बिबट जंगल शिवारात पळून गेला.

जंगलशिवारात पळून गेला - लाखनीचे जखमी वन रक्षक यांना प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे भरती करण्यात आले. नंतर, प्रकृती अस्ताव्यस्त असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, जखमी मादा बिबट हा जंगलशिवारात पळून गेला असल्याने त्याचा वनकर्मचारी शोध घेत आहे. मात्र, संतधर पावसामुळे शोध कार्यात अडथळा येत आहे.

हेही वाचा - Pravin Darekar : 'उद्धव ठाकरेंना सत्तेची लालसा, चटक ठेवली नसती तर...'; प्रवीण दरेकरांनी साधला निशाणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.