ETV Bharat / state

मोहाडी तहसीलदारांनी रेती तस्करांना ठोठावला ७८ लाखांचा दंड

author img

By

Published : Dec 10, 2019, 8:48 AM IST

मोहाडी तालुक्यातील दोन वाळू तस्करांना मोहाडी तहसीलदारांनी तब्बल ७७ लाख ५० हजरांचा दंड ठोठावला आहे. मोहाडी तहसीलदार यांच्या आदेशावरून नायब तहसीलदार मोहाडी यांनी करडी परिसरात अवैध वाळू वाहतूक करताना एक ट्रक पकडला होता. पंचनाम्या दरम्यान ट्रक चालकाने सदर रेतीचा भरणा मुंढरी बु. येथील राजेंद्र शेंडे यांनी अवैध रित्या जमा केलेल्या साठ्यातून आणल्याचे सांगितले होते. त्याआधारे दोघाही आरोपींवर मोहाडी तहसीलदारांकडून कारवाई करण्यात आली.

bhandara
वाळू

भंडारा- मोहाडी तालुक्यातील दोन वाळू तस्करांना मोहाडी तहसीलदारांनी तब्बल ७७ लाख ५० हजरांचा दंड ठोठावला आहे. तालुक्यातील मुंढरी बु. येथील रेती घाटावरून अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करून साठा केल्याप्रकरणी राजेंद्र ग्यानिराम शेंडे यांच्यावर एकूण ७४० ब्रास रेती करिता एकूण ७६ लाख ९६ हजार रुपये दंडाचे आदेश पारित करण्यात आले आहे.

मोहाडी तहसीलदारांनी रेती तस्करांना ठोठावला ७८ लाखांचा दंड

मोहाडी तहसीलदार यांच्या आदेशावरून नायब तहसीलदार मोहाडी यांनी करडी परिसरात अवैध वाळू वाहतूक करताना एक ट्रक पकडला होता. पंचनाम्या दरम्यान ट्रक चालकाने सदर रेतीचा भरणा मुंढरी बु. येथील राजेंद्र शेंडे यांनी अवैधरित्या जमा केलेल्या साठ्यातून आणल्याचे सांगितले. ट्रक चालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे महसूल अधिकाऱ्यांचे पथक मोका चौकशीसाठी राजेंद्र शेंडे यांच्याकडे पोहोचले असता शेंडे यांनी शासकीय गट क्रमांक २७ क्षेत्र २.४० आर मध्ये अंदाजे ७४० ब्रास रेती साठा करून विक्री करीत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी शेंडे यांच्यावर अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करून साठा केल्याप्रकरणी एकूण ७४० ब्रास रेती करिता एकूण ७६ लाख ९६ हजार रुपये दंडाचे आदेश मोहाली तहसीलदारांकडून पारित करण्यात आले.

त्याचबरोबर, जेंद्र शेंडे यांनी जमा केलेल्या अवैध वाळू साठ्यातून वाळू भरून वाहतूक करणाऱ्या तिरोडा येथील ट्रक मालक संजय खोब्रागडे यांच्यावर अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. खोब्रागडे यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम ४८ (७), (८) व अध्यादेश २०१५ मधील तरतुदीनुसार कारवाई करीत प्रति ब्रास २००० आणि पाचपट १०००० रॉयल्टी ४०० रुपये प्रमाणे एकूण ५ ब्रास रेती करिता एकूण ५२ हजार रुपयांचे दंड ठोठावण्यात आले. दंडाच्या रकमेची नोंद शेंडे यांच्या नावाने असलेल्या शेतजमिनीच्या सातबारामध्ये करण्याचे आदेश तलाठ्यांना देण्यात आले आहे.

मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी घाटावर रेतीची अवैध वाहतूक व साठा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. महसूल विभाग यावर कारवाई करीत असेल तरी ते तोकडी असल्याचे सध्याचे चित्र आहे. अवैध रेतीचा व्यवसाय समूळ हद्दपार करण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

हेही वाचा- सामाजिक न्याय भवनात ध्वजदिन निधी कार्यक्रमाचे आयोजन; निधी संकलनाचा शनिवार पासून शुभारंभ

Intro:Anc : मोहाडी तालुक्यातील दोन वाळू तस्करांना मोहाडी तहसीलदारांनी य तब्बल 77 लाख 50 हजरांचा दंड ठोठावला आहे तालुक्यातील मुंढरी बु. येथील रेती घाटावरून अवैधरीत्या रेतीचे उत्खनन करून साठा केल्याप्रकरणी राजेंद्र ग्यानिराम शेंडे यांच्यावर एकूण 740 ब्रास रेती करिता एकूण 76 लाख 96 हजार रुपये दंडाचे आदेश पारित करण्यात आले.

Body:मोहाडी तहसीलदार यांच्या आदेशावरून नायब तहसीलदार मोहाडी यांनी करडी परिसरात अवैध वाळू वाहतूक करताना एक ट्रक पकडला होता पंचनामा दरम्यान ट्रक चालकाने सदर रीतीच्या भरणा मूढरी बु. येथील राजेंद्र शेंडे यांनी अवैध रित्या जमा केलेल्या साठ्यातून आणल्याचे सांगितले त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे महसूल अधिकाऱ्यांची ॲक्टींग मोका चौकशीसाठी पोहोचली असतात शेंडे यांनी शासकीय गट क्रमांक 27 क्षेत्र 2.40 आर मध्ये अंदाजे 740 ब्रास रेती साठा करून विक्री करीत असल्याचे दिसून आले.

राजेंद्र शेंडे यांनी जमा केलेल्या अवैध वाळू साठ्यातून जेसीबी दार आहे वाळू भरून घेणाऱ्या तिरोडा येथील ट्रक मालक संजय खोब्रागडे यांच्यावर अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 48 (7) व (8) व अध्यादेश 2015 मधील तरतुदीनुसार कारवाई करीत प्रति ब्रास 2000 आणि पाचपट 10000 रॉयल्टी चारशे रुपये प्रमाणे एकूण 5 ब्रास रेती करिता एकूण 52 हजार रुपयांचे दंड ठोठावण्यात आले दंडाच्या रकमेची नोंद शेंडे यांच्या नावाने असलेल्या शेतजमिनीच्या सातबारामध्ये करण्याचे आदेश तलाठ्यांना देण्यात आले.

मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी घाटावर रेतीची अवैध वाहतूक व साठा मोठ्या प्रमाणात केला जात आहे महसूल विभाग यावर कार्यवाही करीत असेल तरी कार्यवाही तोकडी असल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे अवैध प्रितीचा व्यवसाय समूळ हद्दपार करण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय इच्छा शक्तीची गरज आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.