ETV Bharat / state

Ashti Taluka Gram Panchayat Election : सरपंचपदासाठी 25 लाखांचा लिलाव; वाचा सविस्तर नेमका काय आहे प्रकार

बीड आष्टी तालुक्यात विचित्र घटना घडल्याचे समोर आले आहे. सरपंच-उपसरपंचपदासाठी ( Many Places The Rule of Democracy has Not Taken Root ) अनूसूचित जाती प्रवर्गासाठी ( Ashti Taluka Gram Panchayat Election ) जागा राखीव झाली आहे. आता या उमेदवारांकडून ( Incident has been observed in Ashti taluka of Beed District ) मंदिर बांधण्याकरिता 25 लाख रुपयांची देणगी मागितली जात आहे. तरच तुम्हाला सरपंच- उपसरपंच करण्यात येणार असल्याचे गावच्या बैठकीत सांगण्यात आले आहे.

Ashti Taluka Gram Panchayat Election
ग्रामपंचायत पिंपरखेड तालुका आष्टी
author img

By

Published : Nov 29, 2022, 8:23 PM IST

बीड : भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाले. यात यावर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात देशात सर्व शासकीय स्तरावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. तरीही अजून बऱ्याच ठिकाणी ( Many Places The Rule of Democracy has Not Taken Root ) लोकशाहीची पाळेमुळे ( Ashti Taluka Gram Panchayat Election ) रुजली नाहीत. अशीच एक घटना बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात ( Incident has been observed in Ashti taluka of Beed District ) घडल्याचे निदर्शनास आले आहे. सरपंच-उपसरपंचपदासाठी 25 लाख ( Bidding up to Rs 25 Lakhs for Post of Sarpanch )रुपयांपर्यंतची बोली लावण्यात आली आहे. मंदिर बांधण्यासाठी 25 लाख रुपयांची देणगी द्यावी लागेल तरच सरपंच-उपसरपंच होता येईल असे गावच्या बैठकीत सांगण्यात आले.

घटनेचा तपशील : सदर घटनाक्रम असा आहे की, आष्टी तालुक्यातील पिंपरखेड येथे सरपंचपदासाठी सध्या निवडणूक लागली आहे. या गावात स्वातंत्र्यानंतर प्रथमच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी जागा राखीव झाली आहे. पन्नास वर्षांनी सरपंचपदासाठी जागा आरक्षित झाल्यानंतरसुद्धा गावातील पांढरपेशी भांडवलदार समाज कंटकांनी गावातील देवीच्या मंदिर बांधकामाचे कारण पुढे करीत बैठक घेऊन गावात सरपंच-उपसरपंच व्हायचे त्यांनी मंदिर बांधकामासाठी पैसे द्यायचे, असा ठराव मांडून बोली लावल्याचे सूत्रांकडून कळाले आहे.

गावातील बैठकीत शेवटी 25 लाखांपर्यंत मंदिराकरिता देणगी देण्याचे ठरले : या गावातील बैठकीत शेवटी 25 लाखांपर्यंत देणगी देऊन मंदिर बांधून देण्याचे ठरविण्यात आले. ज्यांना सरपंच-उपसरपंच व्हायचे त्यांनी मंदिराकरिता 25 लाख रुपये देऊन हे पद घ्यावे. याची संपूर्ण तालुक्यात सर्वत्र चर्चा होत आहे. अनेक गावे पंचवार्षिक निवडणुका आल्या आणि निवडणुका झाल्या तेव्हा कधी सरपंच-उपसरपंचपदासाठी का बोलली लावली नाही. असे असताना सरपंचपद आरक्षित झाल्यावरच हे एकदम कसे सुचले असा सवाल तालुक्यातील मागासवर्गीय समाजातून उपस्थित केला जात आहे.

सदर गावात सरपंच-उपसरपंचपदासाठी बोली लावून लिलाव करणे हे संविधानाने दिलेल्या लोकशाही व्यवस्थित विरोधात आहे. याबाबत सखोल चौकशी करून निवडणूक विभागाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा आष्टी तहसीलदार यांनी संबंधितावर कार्यवाही करावी, अशी मागणी तालुक्यातील मागासवर्गीय जनतेतून होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.