ETV Bharat / state

दीडशे वर्षाची परंपरा जपण्यासाठी आधुनिक 'शंकरपट'; पहिल्यांदाच बैलाऐवजी धावले ट्रॅक्टर

मासळ या गावात दीडशे वर्षांपासून शंकरपटाचे आयोजन केले जाते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने जनावरांच्या शंकर पटावर बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा मान राखत आणि दीडशे वर्षाची परंपरा जोपासत ग्रामस्थांनी नवीन शक्कल लढवली.

author img

By

Published : Feb 5, 2019, 12:59 PM IST

bhandra

भंडारा - जिल्ह्यातील मासळ या गावात दीडशे वर्षांपासून शंकरपटाचे आयोजन केले जाते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने जनावरांच्या शंकर पटावर बंदी घातली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा मान राखत आणि दीडशे वर्षाची परंपरा जोपासत ग्रामस्थांनी नवीन शक्कल लढवली. या वर्षीपासून शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा शंकरपट भरविला.

bhandra
undefined

ज्या पद्धतीने बैलांचा शंकरपट भरविला जात होता अगदी त्याच पद्धतीने ट्रॅक्टरचे शंकरपट भरविले गेले. सहा फूट रुंद असलेला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एक ट्रॅक तयार केला. प्रत्येकाने या ट्रॅक्टरच्या आतूनच ट्रॅक्टर चालवायचा आणि विशेष म्हणजे ट्रॅक्टर रिव्हर्समध्ये चालवायचे होते. ट्रॅक्टरचे चाक जराही ट्रॅकच्या बाहेर गेले तर स्पर्धक बाद होतो.

आधुनिक शंकरपट
undefined

पहिल्या दिवशी एक-एक ट्रॅक्टर कमीत कमी वेळात पोहोचण्याच्या शर्यती होत्या. तर दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवसातील कमी वेळात जिंकणाऱ्या ट्रॅक्टरच्या १० जोड्या लावून त्यांच्या शर्यती लावल्या. एका वेळेला २ ट्रॅक्टर आपापल्या ट्रॅकवरून रिव्हर्समध्ये प्रथम पोहोचण्याचा प्रयत्न करीत होते. पहिल्यांदाच भरविलेला ट्रॅक्टर शंकरपट पाहण्यासाठी गावकऱ्यांनी आणि परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. याच ट्रॅक्टर शंकरपटाच्या बाजूलाच सर्जा राजाचा बाजारही होता. शेतकऱ्याचा जुना मित्र असलेल्या सर्जा, राजाला आजही मोठी मागणी आहे. मात्र, शंकरपटावर बंदी आल्याने पटासाठी प्रसिद्ध असलेल्या बैलजोडीला मिळणारी किंमत आता मात्र मिळत नाही.

आमची दीडशे वर्षाची परंपरा जपण्यासाठी आम्ही ट्रॅक्टर शंकरपटाचे आयोजन केले आहे. बैलांची शंकरपट हे केवळ मनोरंजन नसून बैलांना शेतीसाठी तयार करण्याची पद्धत होती. शंकर पटावर असलेली बंदी उठवून शंकरपट नव्याने सुरू करावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

Intro:ANC : सर्वोच्च न्यायालयाचे मान ठेवत आणि 150 वर्षाची आपली परंपर जोपासत भंडारा जिल्ह्यात साजरा करण्यात आला एक आधुनिक शंकरपट हा नव्या पद्धतीच्या शंकरपट पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती

Body:भंडारा जिल्ह्यातील मासळ या गावात मागील दीडशे वर्षांपासून शंकर पटाचे आयोजन केले जात होते मात्र सर्वोच्च न्यायालयाने जनावरांच्या शंकर पटावर बंदी घातल्याने हा प्रसिद्ध शंकरपट बंद झाला माझा येथील शंकरपट संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध होता त्यामुळे गावकऱ्यांनी ही परंपरा कायम राखण्यासाठी एक नवीन शक्कल लावली आणि यावर्षीपासून शेतकऱ्यांचा आधुनिक मित्र समजल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरचा शंकर पट भरविला.
ज्या पद्धतीने बैलांचा शंकरपट भरविला जात होता अगदी त्याच पद्धतीने ट्रॅक्टरचे शंकरपट भरविले गेले सहा फूट रुंद असलेला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एक ट्रॅक तयार केला गेला आणि प्रत्येकाने या ट्रेकच्या आतूनच ट्रॅक्टर चालवायचा आणि विशेष म्हणजे ट्रॅक्टर रिव्हर्स मध्ये चालवायचे होते ट्रेक च्या बाहेर जराही चाक केला तर स्पर्धक स्पर्धेच्या बाहेर.
पहिल्या दिवशी एक एक ट्रॅक्टर कमीत कमी वेळात पोहोचण्याच्या शर्यती होत्या तर दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशी कमी वेळात जिंकणाऱ्या ट्रॅक्टरच्या त्यांच्या वेळेनुसार दहा जोड्या लावून त्यांच्या शर्यती लावल्या गेल्या एका वेळेला दोन ट्रॅक्टर आपापल्या ट्रॅकवरून रिव्हर जात पहिले पोहोचण्याचा प्रयत्न करीत होते कधी मध्येच एखादा ट्रॅक्टर ट्रेकच्या बाहेर गेल्याने स्पर्धेबाहेर जात होता तर कधी शेवटपर्यंत या दोन्ही ट्रॅक्टरची चुरस पाहायला मिळत होती. पहिल्यांदाच भरविलेल्या ट्रॅक्टर शंकर पट पाहण्यासाठी गावकऱ्यांनी आणि परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती दोन पैकी एक ट्रॅक्‍टर जिंकल्यानंतर लोक त्याठिकाणी जल्लोषही करायचे.
याच ट्रॅक्टर शंकरपटाच्या बाजूलाच सर्जा राज्याचा बाजार हि होता शेतकऱ्याचा जुना मित्र असलेल्या सर्जा राजाला आजही मोठी मागणी आहे मात्र शंकर पटावर बंदी आल्याने पटासाठी प्रसिद्ध असलेल्या बैलजोडीला मिळणारी किंमत आता मात्र मिळत नाही.
आमची दिवशी वर्षाची परंपरा जपण्यासाठी आम्ही ट्रॅक्टर शंकरपटाचे आयोजन केले आहे बैलांची शंकरपट हे केवळ मनोरंजन नसून बैलांना शेतीसाठी तयार करण्याची पद्धत होती त्यामुळे शंकर पटावर असलेली बंदी उठवून शंकर पट नव्याने सुरू करावे अशी मागणी गावकरी करीत आहेत.
बाईट :

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.