ETV Bharat / state

भंडारा येथील 11 लोकांनी केले केस दान, त्यासाठी एकाने चक्क 2 वर्षे वाढवले केस, 'हे' आहे कारण - केस दान भंडारा नागरिक

केस दानाचे महत्त्व नागरिकांना कळावे यासाठी भंडारा शहरातील अकरा नागरिकांनी त्यांचे केस दान केलेले आहेत. विशेष म्हणजे, या 11 पैकी दहा महिला आहेत, तर एका पुरुषाने दोन वर्षे स्वतःचे केस वाढवून त्यानंतर केस दान केलेले आहे. हे केस दान नेमके कशासाठी केले जातात आणि त्याचा फायदा कोणाला होतो, या विषयी जाणून घेऊया.

people bhandara donate hair
केस दान भंडारा नागरिक
author img

By

Published : Dec 15, 2021, 10:09 PM IST

भंडारा - केस दानाचे महत्त्व नागरिकांना कळावे यासाठी भंडारा शहरातील अकरा नागरिकांनी त्यांचे केस दान केलेले आहेत. विशेष म्हणजे, या 11 पैकी दहा महिला आहेत, तर एका पुरुषाने दोन वर्षे स्वतःचे केस वाढवून त्यानंतर केस दान केलेले आहे. हे केस दान नेमके कशासाठी केले जातात आणि त्याचा फायदा कोणाला होतो, या विषयी जाणून घेऊया.

माहिती देताना राहुल श्यामकुवर आणि त्यांची पत्नी

हेही वाचा - Vidarbha Winter : ना ऊन.. ना पाऊस म्हणून हिवाळ्यात असते खेळण्याची हौस!

कर्करोगग्रस्तांसाठी केस

सध्या देशात कर्करोगाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या आजाराच्या उपचारपद्धतीत अनेकदा रुग्णांच्या डोक्यावरील व भुवयांचे केस गळतात. आधीच कर्करोगाने ग्रस्त राहणारा रुग्ण स्वतःला या अवस्थेत पाहून खचून जातो. त्यामुळे, निर्माण होणारा न्यूनगंड आजारावर मात करताना बरेचदा अडचणीचा ठरतो. हा न्यूनगंड निघून जावा म्हणून अशा रुग्णांना कृत्रिमरित्या तयार केलेल्या केसांचा टोप (विग) घातला जातो. देशात बऱ्याच सामाजिक संस्थांद्वारे गरजू कर्करोग रुग्णांना या कृत्रिम केसांचा टोप मोफत दिल्या जातो. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेले केस दान करणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. केस दान करण्याचे प्रमाण वाढावे, नागरिकांमध्ये या दानाविषयी ही जागृती निर्माण व्हावी यासाठी भंडारा जिल्ह्यातील अकरा लोकांनी एक प्रशंसनीय पाऊल उचलले आहे.

राहुल श्यामकुवर यांनी घेतला पुढाकार

भंडारा शहरातील वैशाली नगर येथे वास्तव्याला असलेले राहुल श्यामकुवर यांच्या आईला 2017 मध्ये कर्करोग झाला होता. उपचारादरम्यान त्यांचे केस गळाले. स्वतःची अवस्था पाहून त्या खचल्या आणि 2019 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. या दरम्यान रुग्णालयात एका कृत्रिम पुतळ्यावर केसांचा टोप म्हणजेच, विग ठेवलेला त्यांना दिसला. अधिक चौकशी केल्यानंतर काही संस्था कर्करोगग्रस्तांसाठी मोफत केसांचा टोप तयार करून त्यांचे वाटप करतात, अशी माहिती मिळाली. उत्सुकतेपोटी त्यांनी अधिक चौकशी केली असता टाटा मेमोरियल इन्स्टिट्यूट मुंबई येथे अशा केसांचा विग मोफत वितरण केले जाते हे लक्षात आले. त्याचवेळी टॉप तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या केसांचे दान करणाऱ्यांची संख्या ही नगण्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आईची व्यथा आणि केस दानप्रती असलेली अनास्था पाहून राहुल यांनी टाटा मेमोरियल इन्स्टिट्यूटला केस दान करण्याचा निर्णय घेतला. केस दान करताना असलेली पहिली महत्त्वाची अट म्हणजे, केसांची लांबी 12 इंच असणे गरजेचे होते.

तब्बल दोन वर्ष केस वाढविले

केस दान करण्याचे ठरविल्यानंतर राहुलने तब्बल दोन वर्षे स्वतःचे केस न कापता लांब केले. केस दान करण्याची कल्पना त्यांनी कुटुंबातील सर्वांना सांगितली. पतीच्या या निर्णयाला पत्नीनेही दुजोरा दिला, तसेच कुटुंबातील इतर महिलांनीही त्यांचे केस दान करण्याचे ठरविले.

आईच्या दुसऱ्या पुण्यस्मरणच्या दिवशी केले केस दान

राहुल यांच्या आईचा 27 नोव्हेंबरला दुसरा पुण्यस्मरण होता. या दिवसाचे औचित्य साधून राहुल यांनी त्यांचे केस कापले. त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील तब्बल दहा महिलांनी केस कापले. हे कापलेले सर्व केस एका प्लास्टिकमध्ये गुंडाळून ते कुरियरद्वारे टाटा मेमोरियल इन्स्टिट्यूट मुंबई येथे पाठविण्याचे ठरले. कर्करोगग्रस्त रुग्णांना मोफत विग मिळावी यासाठी समाजसेवी संस्था प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांना लागणारा केसांचा पुरवठा करण्याची जबाबदारी आमच्यासारख्या नागरिकांचा आहे. त्यामुळे, जास्तीत जास्त नागरिकांनी त्यांचे केस दान करावे. केस दान करण्याचे महत्त्व त्यांना समजावे यासाठीच हा प्रयत्न असल्याचे राहुल यांनी सांगितले.

राहुलच्या पत्नीने टक्कल करून कर्करोग रुग्णांना सकारात्मकतेचा दिला संदेश

राहुल यांच्या पत्नी सिंचन विभागात कार्यरत आहेत. कर्करोग ग्रस्तांना लागणाऱ्या विग साठी केस दान करण्याचे ठरल्यानंतर त्यांनी स्वतःची टक्कल करून घेतली. कर्करोग झाल्यानंतर उपचारादरम्यान झालेले केसांची गळती त्यामुळे पडलेले टक्कल यातून येणारे नैराश्य येऊ नये, टक्कल पडल्यानंतर ही स्त्रीलाही निर्भीडपणे जगता येतं हा संदेश देण्यासाठी त्यांनी स्वतःहून टक्कल केली. त्यांच्या या धैर्याचे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी कौतुक करत स्वतःही टक्कल करून त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने पाठिंबा दिला. देशात केस दान करणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढली असा मानस त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - Eknath Shinde On OBC Reservation : इम्पिरिकल डेटा एकत्रित झाल्याशिवाय निवडणुका नको हीच आमची भूमिका : एकनाथ शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.