ETV Bharat / state

युवा सेनेच्या राहुल फरताळे यांच्यावर तलवारीने हल्ला; कारण अस्पष्ट - राहुल फरताळे

युवा सेनेचे विधानसभा अधिकारी राहुल गोकुळ फरताळे यांच्यावर अज्ञात दोघांनी तलवारीने हल्ला केला. यावेळी त्यांच्या पोटात कुकरीचा वार केल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्हा रुग्णालय, बीड
जिल्हा रुग्णालय, बीड
author img

By

Published : Jan 16, 2020, 4:46 PM IST

बीड - बीड येथील युवा सेनेचे विधानसभा अधिकारी राहुल गोकुळ फरताळे यांच्यावर आज (गुरुवारी) दुपारी 1 वाजता सारडा नगरी परिसरात दोघांनी तलवारीने हल्ला केला. यामध्ये राहुल फरताळे जखमी झाले असून त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दुपारी सारडा नगरी समोर दोघांनी हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली.

जिल्हा रुग्णालय, बीड

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, राहुल फरताळे हे सावता माळी चौकाच्या दिशेने आपल्या घरी चालले असताना सारडा नगरी समोर अचानक दोघांनी समोरून येऊन डोळ्यात चटणी टाकली व मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान एकाने पोटात कुकरीचा वार केला असल्याचे राहुल यांनी सांगितले.

या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून राहुल फरताळे यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. हा हल्ला कोणी व कशासाठी केला यासंबंधी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत. घटनेबाबत बीड शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली असून पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

हेही वाचा - बीडमध्ये दोन अपघातात दोघांचा मृत्यू; वाहतूक सुरक्षा सप्ताहात अपघातांचे सत्र सुरुच

Intro:बीडमध्ये युवा सेनाच्या राहुल फरताळे यांच्यावर तलवारीने हल्ला; कारण अस्पष्ट

बीड- बीड येथील युवा सेनेचे विधानसभा अधिकारी राहुल गोकुळ फरताळे यांच्यावर गुरुवारी दुपारी एक वाजता सारडा नगरी परिसरात दोघांनी तलवारीने हल्ला केला यामध्ये राहुल फरताळे जखमी झाले असून बीड जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दुपारी सारडा नगरी समोर दोघांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, राहुल फरताळे हे सावता माळी चौकाच्या दिशेने आपल्या घरी चालले असताना सारडा नगरी समोर अचानक दोघांनी समोरून येऊन डोळ्यात चटणी टाकली व मारहाण करण्यास सुरुवात केली. यादरम्यान एकाने पोटात कुकरीचा वार केला असल्याचे राहुल यांनी सांगितले. या हल्ल्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून राहुल फरताळे यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. हा हल्ला कोणी व कशासाठी केला यासंबंधी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत. घटनेबाबत बीड शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली असून पुढील तपास शहर पोलिस करत आहेत.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.