बीड : बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत 22 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या ( Youth committed suicide by hanging ) केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. बीडच्या धांडे नगर रोडवरील शिवश्रुष्टी नगरमध्ये साईनाथ बाबासाहेब तांदळे वय 22 वर्षे याने भाड्याच्या घरात आतून दरवाजा लावून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा तरुण एका खाजगी रुग्णालयामध्ये काम करत होता.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट : साईनाथ बाबासाहेब तांदळे याच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. त्याच्या आत्महत्येची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत ( Police investigating ) आहेत. पोलिसांनी अद्याप कोणत्याच गोष्टीचा उलगडा केलेला नाही.
बीडमध्ये पिकांच्या नुकसानीमुळे आत्महत्या : बीडच्या गेवराई मधील धोंडराई व तलवाडामधील भोगलगाव येथे दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. (Two farmers committed suicide). या दोन्ही शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून गळफास लाऊन आत्महत्या केली आहे. पोलीस उपनिरीक्षक भुतेकर व पोलीस जमादार नवनाथ डोंगरे तर धोंडराई येथील घटनास्थळी पोलीस जमादार दत्ता उबाळे दाखल झाले होते . दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.