बीड - परतीच्या पावसाने तळहाताच्या फोडासारखी जपलेली सोयाबीन उद्धवस्त ( soybean crop Damage due to rain )झालीय. यामुळे उद्धवस्त झालेली सोयाबीन पाहून, अल्पभुधारक शेतकऱ्याने, सोयाबीनच्या ढिगाऱ्यासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या ( Farmer commit suicide by hanging themselves ) केलीय. ही धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना, बीडच्या केज तालुक्यातील राजेगाव येथे आज घडलीय.
तीन मुली, एक मुलगा : संतोष अशोक दौंड वय 40 रा. राजेगाव ता. केज असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव ( Farmer Suicide In Beed ) आहे. संतोष यांना तीन मुली आणि एक मुलगा असून त्यातील एक मुलगी लग्नाला आलेली आहे. या वर्षीच्या पिकाचे पैसे आल्यावर मुलीचं लग्न करता येईल, अशी इच्छा त्यांनी घरी बोलून दाखवलेली होती. मात्र परतीच्या पावसाने डोळ्यादेखत काढलेलं सोयाबीन वाहून गेलं तर काही भिजलं. तर ठिकाणी कापूस होता त्याच्या देखील पावसाने वाती झाल्या.
नैराश्येतून गळफास : यामुळं आता मुलीचं लग्न कसं करायचं ? सोसायटीचं कर्ज कसं फेडायचं? या नैराश्येतून त्यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा ( Farmers commit suicide due to depression ) संपवलीय. दरम्यान सकाळी सोयाबीन वेचायला गेलेला संतोष अजून कसे परतले नाही ? हे पाहण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांना त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेहच दिसल्याने त्यांनी एकच टाहो फोडला.
तळहाताच्या फोडासारखी पिक जपली : दरम्यान बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालंय. तळहाताच्या फोडासारखी जपलेली पिकं उद्धवस्त झाली असून शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचा वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळं मायबाप सरकारनं शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे.