ETV Bharat / state

Beed Crime : धक्कादायक! दुसरी मुलगी नको म्हणून परळीत अक्षरशः कापून काढला गर्भ - गर्भपात प्रकरण परळी बीड

दुसरी मुलगीच आहे म्हणून एका विवाहितेचा गर्भ अक्षरशः कापून काढल्याचा धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. गर्भात ( Abortion Case Parli ) मुलगीच आहे हे लक्षात आल्यानंतर पती आणि सासूच्या सांगण्यावरून हा गर्भपात करण्यात आला. मुलगी असो की मुलगा, मला गर्भपात नको, अशी विनवणी महिलेने केली मात्र डॉक्टरने दुर्लक्ष केले. अखेर त्या आईच्या तक्रारीवरुन पती, सासू, डॉक्टर आणि अन्य एका व्यक्तीवर संभाजीनगर पोलीस ( Sambhajinagar Police ) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

beed
beed
author img

By

Published : Jul 27, 2022, 2:57 PM IST

बीड - डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी घटना बीड जिल्ह्यातील परळ येथे उघडकीस आली आहे. दुसरी मुलगीच आहे म्हणून एका विवाहितेचा गर्भ ( Abortion Case Parli ) अक्षरशः कापून काढल्याचा धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलिसांत ( Sambhajinagar Police ) गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. मुलगाच हवा या हट्टापायी कुटुंबीयांनी डॉ. स्वामी यांना हाताशी धरून बेकायदेशीरपणे गर्भलिंगनिदान केले. गर्भात मुलगीच आहे हे लक्षात आल्यानंतर पती आणि सासूच्या सांगण्यावरून हा गर्भपात करण्यात आला. मुलगी असो की मुलगा, मला गर्भपात नको, अशी विनवणी महिलेने केली मात्र डॉक्टरने दुर्लक्ष केले. अखेर त्या आईच्या तक्रारीवरुन पती, सासू, डॉक्टर आणि अन्य एका व्यक्तीवर संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सासरी सुरू होता छळ : पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, २०२० साली तिचे लग्न नारायण अंकुश वाघमोडे याच्यासोबत झाले. नारायण परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रात नोकरीवर आहे. लग्न झाल्यापासूनच पती नारायण आणि सासू छाया तिचा मारहाण, शिवीगाळ करून छळ करत. तिला माहेरी देखील बोलू देत नसत. दरम्यान, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. त्यानंतर यावर्षी ती महिला पुन्हा गर्भवती राहिली. दुसरी मुलगी नको, मुलगाच हवा असा हट्ट केला.

महिलेची विनवणी ऐकली नाही : दुसऱ्यांदा गर्भवती असलेल्या महिलेकडून मुलगाच हवा असा हट्ट पती आणि सासूने धरला. सोनोग्राफी करून गर्भलिंगनिदान करू आणि मुलगी असली तर गर्भपात करायचा असे ते म्हणू लागले. मात्र, मुलगा असो की मुलगी मला गर्भपात करायचा नाही असे महिलेने स्पष्ट सांगितले. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पती आणि सासूने जून महिन्यात गर्भलिंगनिदानासाठी डॉ. स्वामीसोबत संपर्क साधला. डॉ. स्वामीने सोनोग्राफी मशीन घेऊन घरी येत त्या महिलेचे गर्भलिंगनिदान केले आणि मुलगी असल्याचे सांगितले. मुलगी असली तरी पाहिजे, गर्भपात नको असे म्हणताच पतीने महिलेला पुन्हा मारहाण केली.

न सांगता दिले गर्भपाताचे इंजेक्शन : जुलै महिन्यात महिला आजारी पडली. तिला ताप, उलट्याचा त्रास होऊ लागला. १५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता सासूचा मेहुणा प्रकाश कावळे हा पुन्हा डॉ. स्वामीला घेऊन घरी आला. यावेळी सुद्धा पती, सासू, डॉक्टर आणि प्रकाश यांच्यात गर्भपात करण्यासंदर्भात कुजबुज सुरु होती. त्यानंतर डॉ. स्वामीने पुन्हा सोनोग्राफी केली. तापेसाठी इंजेक्शन देत आहे असे सांगत त्याने तिला गर्भपाताचे इंजेक्शन टोचले आणि प्रकाशसोबत तिथून निघून गेला. त्यानंतर एक-दिड तासाने तिला पोटदुखीचा त्रास सुरु झाला आणि विश्वासघाताने गर्भपाताचे इंजेक्शन टोचण्यात आल्याचे तिने ओळखले. महिलेने ताबडतोड पुणे येथे राहणाऱ्या भावाला मेसेज करून सर्व माहिती दिली. माझा जबरदस्तीने गर्भपात करणार आहेत, तू लवकर ये असेही तिने भावाला सांगितले.

पिशवीला छिद्र करून काढला गर्भ : इंजेक्शन दिल्यानंतर महिलेला होणारा त्रास काही कमी होत नव्हता. त्यामुळे १६ जुलै रोजी पहाटे १.३० वा. डॉ. स्वामी पुन्हा तिच्या घरी आला त्याने महिलेची तपासणी केली. पिशवीला छिद्र करून गर्भ काढावा लागेल, असे त्याने सांगितले. यावेळी देखील माझा गर्भपात करू नका, अशी विनवणी महिला वारंवार करत होती. मात्र, सर्वांनीच तिच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सासूने तिचे हात पकडले आणि डॉ. स्वामीने अक्षरशः गर्भ कापून तुकडे करून बाहेर काढला. त्यानंतर पती, सासू आणि प्रकाश कावळे हे विल्हेवाट लावण्यासाठी तो गर्भ घेऊन निघून गेले. झालेल्या प्रकाराबद्दल कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी त्यांनी महिलेला दिली.

चौघांवर गुन्हा दाखल : १६ जुलै रोजी सकाळी भाऊ आला. पती, सासू यांना विनंती करून रात्री तो बहिणीला घेऊन पुण्याला गेला. गर्भपात झालेला असल्यामुळे तिथेही तिला खूप शारीरिक त्रास झाला. अखेर तिने पोलीस ठाणे गाठून झालेल्या प्रकाराविरोधात तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पती नारायण वाघमोडे, सासू छाया वाघमोडे, डॉ. स्वामी आणि प्रकाश कावळे या चौघांवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या आधी काही वर्षांपूर्वी अवैध गर्भपाताच्या घटनांमुळे परळी चर्चेत आले होते. मात्र काही वर्षात घटना थांबल्या अस वाटत असताना पुन्हा एकदा झालेल्या या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे.

हेही वाचा - six suspected youths assaulted in vaishali: वैशालीमध्ये साधूच्या वेशात सापडले 6 संशयित तरुण, बजरंग दलाने दिला चोप, व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.