बीड - विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्याकडून मोठ्या फरकाने पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना भाजप पक्षश्रेष्ठी विधान परिषदेवर संधी देणार का? अशा चर्चांना सध्या उधान आले आहे. विशेष म्हणजे जनतेने नाकारल्यानंतरही पंकजांना संधी मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतर करून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांना भाजप विधान परिषदेवर संधी देणार नसल्याचे समोर येत आहे. असे असताना भाजप पक्षश्रेष्ठी पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देणार का? याची चांगलीच चर्चा होत आहे.
दिवाळीनंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचाली प्रचंड वेगाने सुरू होतील. भाजप शिवसेनेच्या मंत्रिमंडळात बीडच्या पंकजा मुंडे यांचा समावेश आहे की, नाही याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र, परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेने पंकजा मुंडे यांना नाकारले आहे. 30 हजाराहून अधिक मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. जनतेने नाकारूनही भाजप पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देणार का? या मुद्याभोवती मागील दोन दिवसांपासून राज्यात चर्चा होत आहे. मात्र, वस्तुस्थिती लक्षात घेतली तर पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणे अवघड असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा - परळीच्या जनतेचा विश्वास वाया जाऊ देणार नाही- धनंजय मुंडे
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने पक्षात मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील नेत्यांचे 'इनकमिंग' केले. या नेत्यांना पदे देण्याबाबत भाजप पक्षश्रेष्ठी यांनी आश्वस्थ केले होते. अशा परिस्थितीत पक्षांतर केलेल्या नेत्यांचे पुनर्वसन करण्याचे मोठे आव्हान भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांसमोर आहे. अशा परिस्थितीत 30 हजारांहून अधिक मतांनी पराभूत झालेल्या, शिवाय जनतेने नाकारलेल्या पंकजा मुंडे यांना भाजप मंत्रिमंडळात घेईल, याची शक्यता कमी असल्याचे देखील राजकीय विश्लेषक सांगतात.