बीड - सारा भारत देश रेल्वेने प्रवास करून थकलेला असताना बीड जिल्हा मात्र, रल्वे आपल्या जिल्ह्यात कधी सुरू होईल या प्रतिक्षेत आहे. आजही बीड जिल्ह्यात असंख्य असे लोक आहेत, जे रेल्वेत बसलेच नाहीत. त्यामुळे रल्वे सुरू व्हाही या अपेक्षेसह रेल्वेत बसण्याचे कुतुहलही येथे मोठे आहे. मात्र, ही बीडकरांची इच्छा काही आणखी पुर्ण झालेली नाही. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या काळात त्यांनी बीडला रेल्वे येण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र, मुंडे हयात असताना या प्रकल्पाला यश आले नाही. कालांतराने मुंडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि हा प्रश्न पुन्हा लांबणीवर पडला. हा प्रलंबीत प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार आंदोलन होते. नुकतेच, असेच एक आंदोलन येथे झाले आहे. यामध्ये येथील विद्यार्थी युवा रेल्वे कृती समीती व सर्वपक्षीय बीडकरांनी रेल्वेचे प्रतिकात्मक डब्बे ओढत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आंदोलन केले आहे.
रेल्वे मार्गासाठी राज्याने 50 % वाटा व केंद्राने 50 % वाटा उचलला
मागच्या आनेक वर्षांपासून अनेक आंदोलने झाली. परंतु, या निगरगठ्ठ सरकारने व राजकीय इच्छाशक्ती नसलेल्या लोकप्रतिनीधींसह आडमुठ्या प्रशासनामुळे आजपर्यंत नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गास उशीर झाला आहे. या रेल्वे मार्गासाठी राज्याने 50 % वाटा व केंद्राने 50 % वाटा उचलला असून, आजपर्यंत वेळेवर कामाला पैसे देण्यास ना केंद्र तत्पर आहे ना, राज्य सरका तत्पर आहे. केवळ रेल्वेचा विषय निघाला की राजकारण कारायचे आणि निवडणुका लढवायच्या असे सुरू आहे. प्रत्येकवेळी रेल्वे सुरू होईल या आशेने जनता मतदान करते. मात्र, पून्हा पाच वर्ष हे काढून लोकप्रतिनिधी जनतेच्या या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष करतात.
खासदार प्रितम मुंडे रेल्वेबाबतचा प्रश्न मार्गी लावतील अशी लोकांना अपेक्षा
गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या खासदार प्रितम मुंडे रेल्वेबाबतचा प्रश्न मार्गी लावतील अशी येथील काही नागरिकांना आशा आहे. मात्र, कित्येक दिवसांपासून रेल्वे रुळाचे काम सुरू आहे. परंतु, या रुळावर रेल्वे काही धावत नाही. ती कधी धावणार म्हणून, आता येथील विद्यार्थी युवा रेल्वे कृती समीतीने हे आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनामध्ये विद्यार्थी युवा रेल्वे कृती समीतीचे अध्यक्ष जयप्रकाश आघाव, उपाध्यक्ष-अँड. गणेश करांडे, सचिव,संगमेश्वर आंधळकर, ॲड. अंबादास आगे, मोहन जाधव, राजेश शिंदे, ॲड. गणेश मस्के, ॲड. महेश धांडे, राजेंद्र नाईकवाडे, मळीराम यादव, जोतीराम हरकूडे, शैलेश जाधव, युवराज जगताप ॲड. शफीक भाऊ, बाबु लव्हाळे, यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.