बीड - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पी अधिवेशनात सोमवारी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी विशेष घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये कृषी, क्रीडा, आरोग्य या विविध क्षेत्राला विशेष पॅकेज घोषित केले आहे. याबाबत सर्वसामान्य नागरिकांना काय वाटते. यासंदर्भात घेतलेल्या प्रतिक्रिया
हेही वाचा - राज्य अर्थसंकल्प; आरोग्य क्षेत्रासाठी ७,५०० कोटींची तरतूद
शेतकऱ्यांना आधार मिळेल असा अर्थसंकल्प- ज्ञानेश्वर खांडे
सोमवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प शासनाने सादर केला आहे. शेतकऱ्यांना तीन लाख रुपया पर्यंत बिगर व्याजी कर्ज देण्याची घोषणा केलेली आहे. याचा परिणाम कृषी क्षेत्राला व पर्यायाने शेतकऱ्यांना आधार मिळेल. असे मत बीड येथील सीए ज्ञानेश्वर खांडे यांनी व्यक्त केले आहे. याशिवाय उद्योग क्षेत्राला देखील निधी देऊन उभारणीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले.
महिलांसाठी चांगल्या घोषणा-
बीड येथील सीए शुभदा जाधव यांनी राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत मत मांडताना म्हटले आहे की, आरोग्य क्षेत्रात येणाऱ्या काळात 5 मेडिकल कॉलेज उभारण्याची शासनाने घोषणा केली आहे. त्याच बरोबर महिलांच्या नावावर घर घेणार असाल तर एक टक्का स्टॅम्प ड्युटी शुल्क माफ केले जाणार आहे. याचा परिणाम महिलांच्या नावावर प्रॉपर्टी होऊ शकेल अथवा ती मानसिकता वाढीला लागेल. त्याच बरोबर शालेय विद्यार्थिनी साठी मोफत ट्रॅव्हलिंग ची व्यवस्था करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थसंकल्पात महत्त्वाची ठरत आहे, असे शुभदा जाधव म्हणाल्या.
हेही वाचा - महा अर्थसंकल्प २०२१ : सांस्कृतिक कार्य विभागास 161 कोटी रुपयांची तरतूद