बीड - जायकवाडी धरणाचे पाणी सोडल्यामुळे आणि गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. जिल्ह्यामधील माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोली गावाच्या परिसरातील काही छोट्या गावांचा संपर्क तुटला आहे.
गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; पावसामुळे सांडस चिंचोली परिसरातील गावांचा तुटला संपर्क - बीड सांडस चिंचोली पाऊस न्यूज
दरवर्षी मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असते. यंदा मात्र चांगला पाऊस होत आहे. जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे गोदावरी नदीला पाणी आले आहे. सांडस चिंचोली परिसरातील गावांचा संपर्क काही वेळासाठी तुटला होता. शुक्रवारी दुपारनंतर मात्र पाणी कमी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. सध्या येथील गावांना कुठलाही धोका नसल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.
बीड पाऊस बातमी