ETV Bharat / state

वैद्यनाथ साखर कारखान्यात आग; लाखो रुपयांचे नुकसान - loss

आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. साखर कारखान्याच्या परिसरातच अग्निशमन दलाची गाडी उभी असल्याने तत्काळ आग विझवण्यासाठी मदत मिळाली.

परळीतील साखर कारखान्याला लागली आग
author img

By

Published : Mar 27, 2019, 5:11 PM IST

बीड - परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याला बुधवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ही आग प्रथम कारखान्याच्या परिसरातील भुशाला लागली. त्यानंतर ही आग प्रचंड रूप धारण करत सर्वत्र पसरली. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. साखर कारखान्याच्या परिसरातच अग्निशमन दलाची गाडी उभी असल्याने तत्काळ आग विझवण्यासाठी मदत मिळाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग आटोक्यात असून नेमके किती रुपयांचे नुकसान झाले, याचा नेमका आकडा अद्याप सांगता येणार नाही. आगीचे स्वरूप मोठे होते. मात्र अग्निशमन विभागाच्या गाड्या वेळेत आल्याने आग आटोक्यात आली आहे.
आगीमुळे कारखाना परिसरातील लोखंडी अँगल व काही कारखान्यातील साहित्यदेखील जळाले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आग आटोक्यात आहे.

Intro:खालील बातमी चे व्हिज्युअल डेस्क च्या व्हाट्सअप ग्रुप वर सेंड केले आहे.....
*********************

साखर कारखान्याला लागली आग; कारण अस्पष्ट
बीड- जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याला बुधवारी दुपारी दीड वाजता अचानक आग लागली या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारखान्याच्या परिसरातच ठेवलेल्या भुसा याला सर्वप्रथम आग लागली. त्यानंतर आगीने कारखान्याच्या परिसराला वेढले. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Body:बीड जिल्ह्यातील परळी येथील वैद्यनाथ साखर कारखान्याच्या परिसरातच अग्निशमन विभागाच्या गावाने उभी असल्यामुळे तात्काळ आग विजवण्यासाठी मदत मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग आटोक्यात असून नेमके किती नुकसान झाले आहे. याचा नेमका आकडा सद्यस्थितीत सांगता येणार नाही. आगीचे स्वरूप मोठे होते. मात्र अग्निशमन विभागाच्या गाड्या वेळेत आग विजवण्यासाठी आल्याने आग आटोक्यात आली आहे.

Conclusion:आगीमुळे कारखाना भागातील लोखंडी अँगल व काही कारखान्यातील साहित्य देखील जळालेले असल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून आग आटोक्यात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.