बीड - येथील आरोग्य विभागाच्या वतीने मंगळवारी 34 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
बीड तालुक्यातील बेलापुरी येथील 32 वर्षीय महिला व गेवराई तालुक्यातील शिरसदेवी येथील 26 वर्षीय पुरुष असे दोघे मंगळवारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. विशेष म्हणजे हे दोघेही मुंबई येथून बीड जिल्ह्यात आलेले आहेत. जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने एकूण 36 अहवाल तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्याचा रिपोर्ट मंगळवारी आला. यामध्ये 31 अहवाल निगेटिव्ह तर 3 अनिर्णित आहेत. आज घडीला जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 24 झाली आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 34 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.