बीड - भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीवरील दोघे ठार झाल्याची घटना रविवारी धारूर-चिंचपूर रस्त्यावर घडली. या दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये एका पाच वर्षीय बालकाचा समावेश आहे. भानुदास साळवे (वय ३०), अनिकेत साळवे (वय ५), राहणार केहाळ वडगाव ता. मंठा जि. जालना अशी मृतांची नावे आहेत.
धारूर ते चिंचपूर रस्त्यावर रविवारी मोटरसायकलला (एमएच १२ झेडए २६३०) धारूरकडे निघालेल्या ट्रॅक्टरने (एमएच ०९ सीजे ८११४) जोराची धडक दिली. या घटनेत दोनजण ठार झाले. तर, पवन साळवे (वय ३५) हे गंभीर जखमी असून त्यांना धारूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचाराकरता दाखल करण्यात आले होते. नंतर अधिक उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
हेही वाचा - ..अखेर मुहूर्त मिळाला; बीडमध्ये 'या' तारखेला होणार सभापती, जि. प. अध्यक्षांची निवड
हेही वाचा - आदित्य सारडांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून हटवले