बीड- जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामधील गुळज (भगवान नगर) येथे कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शालेय विद्यार्थी बुडाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी समोर आली आहे. बुधवारी रात्री उशिरा ही घटना येथील ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर बुडालेल्या मुलांचा शोध सुरू केला. गुरुवारी दुपारी एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
शेख अरबाज (13) रा. पैठण व शेख नाशिर (12) रा. रामपुरी अशी बुडालेल्या दोन विद्यार्थ्यांची नावे आहेत. यामध्ये अरबाज शेख या तेरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला असून नासिर शेख याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, गेवराई तालुक्यातील गुळज (भगवान नगर) येथे आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी आलेले दोन शाळकरी विद्यार्थी बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास येथुन जवळच असलेल्या पैठण उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेले होते. यादरम्यानच पाय घसरून कालव्यातील वाहत्या पाण्यात पडल्यामुळे दोघेही बुडाले. सदरील दोन्ही मुले वाहत्या पाण्यात बुडाल्याचा अंदाज येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यामध्ये शेख अरबाज याचा मृतदेह सापडला असून दुसरा मुलगा नासिर शेख याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
सदर घटना घडल्यापासून नातेवाईक त्यांचा शोध घेत असुन बीड येथील शोध पथकाच्या मदतीने रात्री उशीरा शेख अरबाजचा मृतदेह सापडला आहे. उमापुर पोलीसात घटनेची माहिती देण्यात आली. दरम्यान रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरु होते. रात्री १० वाजता तळणेवाडी येथील सीआर चार वरील गेट वर येऊन नातेवाईक शेख नाशेर याचा शोध घेत होते मात्र रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. सदरील घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा -खालापुरातील 4 वर्षीय गिर्यारोहकाने केला अनोखा विक्रम; 25 मिनिटांत सर केला कलावंतीण दुर्गाचा सुळका