बीड - परळी शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज वाढ होत असुन रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी बऱ्याच अडचणीला सामोरे जावे लागते. येथील लोकसेवा सामाजिक विकास प्रतिष्ठानतर्फे परळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश कुरमे व वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्शद शेख यांच्या हस्ते वाहनाची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.
गरजूवंतानी संपर्क करण्याचे आवाहन
होंडा सीआरीव्ही गाडी क्रमांक MH 02 AK 6081 असून संपर्कासाठी हेल्पलाइन क्र : 9527413467 या मोबाइल क्रमांकावर वाहन चालक नितीन म्हस्के यांच्याशी गरजवंतांनी संपर्क करावा, असे लोकसेवा सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष बालाजी गायकवाड यांनी कळवले आहे. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष दतात्रय काळे, ज्येष्ठ पत्रकार अनिरुद्ध जोशी, मराठवाडा साथी पीसीएन संपादक मोहन व्हावळे, अश्विन मोगरकर, शंकर गायकवाड, विक्रम कुरील आदी उपस्थित होते.
हेही वाचा - 'लस उपलब्ध नसेल तर, 1 मेपासून सुरू होणारी लसीकरण मोहीम राबवायची कशी'