ETV Bharat / state

Transgender Wedding in Beed : महिला दिनी होणार किन्नर सपना आणि बाळूचा अनोखा विवाह सोहळा - तृतीयपंथी किन्नर महिला प्रश्न

बीडमध्ये सपना नामक एक किन्नर महिला बाळू नामक युवकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ( youth relationship with transgender ) राहत आहेत. त्यांना कायदेशीर विवाह करायचा ( legal marriage of transgender ) आहे. मात्र प्रशासकीय अडचणी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.

किन्नर सपना आणि बाळूचा विवाह
किन्नर सपना आणि बाळूचा विवाह
author img

By

Published : Mar 4, 2022, 8:35 PM IST

बीड- जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरात किन्नर सपना आणि तिचा प्रेमवीर बाळू यांचा विवाह सोहळा ( Transgender Wedding in Beed ) होणार आहे. हा विवाह सोहळा ऐतिहासिक ग्रामदैवत असलेल्या श्रीक्षेत्र कंकालेश्वर मंदिरात सोमवारी ( 7 मार्च ) सकाळी 11.35 वाजता धार्मिक विधीनुसार ( marriage in Kankaleshwar Temple ) होणार आहे. या विवाह सोहळ्याची जबाबदारी करणी सेनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या राजपूत आणि त्यांच्या टीमने स्वीकारली आहे.

विवाहाच्या पार्श्वभूमीवर रितीरिवाजानुसार नवरदेव बाळूला हळद लावण्याचा कार्यक्रम गुरुवार रात्री पार पडला. 5 दिवस नवरदेवाला हळद लावण्यात येणार आहे. रविवारी किन्नर सपना यांच्या राहत्या घरी हळदीचा अनोखा कार्यक्रमदेखील करण्यात येणार आहे.

हेही वाचा-Ajit Pawar On OBC Reservation : ओबीसी आरक्षणासाठी मध्यप्रदेश सरकारप्रमाणे विधेयक मांडणार - अजित पवार

तृतीयपंथी किन्नर महिला आजदेखील उपेक्षित
नैसर्गिकदृष्ट्या पुरुषत्व किंवा स्त्रीत्व लाभलेले नाही, अशा तृतीयपंथी किन्नर महिला आजदेखील उपेक्षित आहेत. त्यांच्या प्रश्नांना सरकार आणि प्रशासनस्तरावर न्याय मिळावा या हेतूने करणी महिला सेनेच्या प्रदेशाध्यक्षा संध्या राजपूत यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी किन्नर सपना आणि बाळू यांच्या विवाहाची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारली आहे. संसार उपयोगी साहित्य बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवेंद्र शेटे यांनी देण्याचे जाहीर केले आहे. या सर्व दानशूरांचे जगद्विवेक प्रतिष्ठानच्यावतीने आभार मानण्यात आले आहे. या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करणी महिला सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा-Go Back Modi Banner In Pune : पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी पुण्यात 'मोदी गो बॅक'चे पोस्टर

विवाहाची जबाबदारी करणी महिला सेनेने उचलली-
बीडमध्ये सपना नामक एक किन्नर महिला बाळू नामक युवकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ( youth relationship with transgender ) राहत आहेत. त्यांना कायदेशीर विवाह करायचा ( legal marriage of transgender ) आहे. मात्र प्रशासकीय अडचणी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्याचबरोबर समाजातून प्रचंड विरोध होत आहे. त्याला न जुमानता हे जोडपे संघर्ष करत आहे. त्यांना न्याय हक्क देण्यासाठी समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. करणी महिला सेना खंबीरपणे पाठीशी उभी राहिली आहे. हा विवाह सोहळा लावून देण्याची खर्चासह जबाबदारी स्वीकारली आहे. करनी महिला सेनेच्या प्रदेशाध्यक्षा संध्या राजपूत आणि त्यांच्या सहकारी प्रीत कुकडेजा, शितल धोंडरे, शीतल राजपूत यांनी अनोखे कन्यादान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना अधिकृत विवाह बंधनाचा कायदेशीर हक्क देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेदेखील जाहीर केले आहे.

हेही वाचा-Vijay Barse Reaction on Jhund : 'मी आनंदी आणि समाधानी'; झुंड बघितल्यानंतर प्राध्यापक विजय बारसे यांची प्रतिक्रिया

विवाह आमच्या इच्छेनुसारच - सपना, बाळू
बीड जिल्ह्यात किंबहुना मराठवाड्यामध्ये किन्नर महिलेसमवेत होत असलेला हा पहिला कदाचित विवाह आहे. हा विवाह बाळू आणि सपना या दोघांच्या प्रेमातून स्वइच्छेने होत आहे. हा विवाह कोणाच्याही सांगण्यावरून होत नाही. या विवाहाला कोणीही विरोध न करता शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन नववधू किन्नर सपना आणि नव वर बाळू यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.