बीड - व्यापारी हा मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्यावरच येथील रोजगार अवलंबुन आहे, असे मत बीडचे अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी व्यक्त केले. बीड जिल्हा व्यापारी महासंघाच्या वतीने आयोजित अन्न औषध प्रशासन मार्गदर्शन शिबीरात ते बोलत होते.
हे ही वाचा - माजलगाव विधानसभा: भाजप समोर अंतर्गत बंडखोरी रोखण्याचे आव्हान
व्यापारी हा मराठवाडयाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या भागात मोठे ऊद्योग नाहीत, त्यामुळे व्यापारावरच येथील रोजगार अवलंबून आहे. आज व्यापारात खरेदी, विक्री आणि नफा इतके सरळ सुत्र राहिलेले नाही. व्यापारात आधुनिकता स्वीकारावी लागणार आहे. बदलत्या कायद्यांचे आणि नियमांचे ज्ञान घेऊन त्याचा अंगिकार झाला पाहिजे त्यासाठीच अशा मेळाव्यांची गरज असल्याचे कबाडे म्हणाले.
हे ही वाचा - परळीत बहीण-भावांची प्रतिष्ठा पणाला; धनंजय मुंडे सोमवारी ठरवणार प्रचाराची व्यूहरचना
अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त कृष्णा दाभाडे यांनी अन्न पदार्थासंदर्भातील अन्न सुरक्षा मानके कायदा हा महत्वाचा असून रोजच्या जगण्यात या कायद्याचा संबंध आहे. यासाठीचा परवाना असल्याशिवाय व्यापार करता येत नाही. त्यासाठी सर्वांनी अन्न नोंदणी करून घ्यावी आणि मोठ्या व्यवसायिकांनी अन्न परवाना घ्यावा. आम्ही व्यापाऱ्यांसोबत आहोत, यावेळी सर्वांनीच कायद्याचे पालन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या मेळाव्यात अन्न सुरक्षा मानके या संदर्भातील कायदे, परवाने आदींची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद पिंगळे यांनी केले.
हे ही वाचा - कन्नड मतदारसंघात जाधवांची प्रतिष्ठा पणाला; शिवसेना लोकसभेचा वचपा काढणार??
या कार्यक्रमासाठी अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त कृष्णा दाभाडे, सहाय्यक आयुक्त रामेश्वर डोईफोडे, अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश मरेवार, केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अरुण बरकसे, व्यापारी महासंघाचे संतोष सोहणी, जवाहर कांकरिया, अशोक शेटे, विनोद पिंगळे आदिंची उपस्थिती होती. या मेळाव्याला जिल्हाभरातून व्यापाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.
हे ही वाचा - 'या' निवडणुकीमुळे गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाला मिळाली होती कलाटणी!