ETV Bharat / state

देशातील एकमेव सासू-सुनेचे मंदिर बीडमध्ये - बीड सासू सुन मंदिर बातमी

सासू-सुनेच्या नात्याबाबत कधी थट्टेचा विषय असतो तर कधी कटूता असते. मात्र, यापेक्षा वेगळा प्रकार म्हणजे भारतातील एकमेव सासू-सुनेचे मंदिर बीडमध्ये आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jan 17, 2021, 3:03 PM IST

Updated : Jan 17, 2021, 3:22 PM IST

बीड - सासू-सुनेच्या नात्याबाबत कधी थट्टेचा विषय असतो तर कधी कटूता असते. मात्र, यापेक्षा वेगळा प्रकार म्हणजे भारतातील एकमेव सासू-सुनेचे मंदिर बीडमध्ये आहे. या मंदिराची स्थापना साधारणतः वीस-पंचवीस वर्षांपूर्वी विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रेरणेतून झालेली असल्याचे जगदीश पिंगळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे बीड येथील या सासू-सुनेच्या मंदिरात दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. यामध्ये उत्कृष्ट सासू-सून असलेल्या महिलांचे सत्कार करण्याची प्रथा येथील मंदिरात आहे.

देशातील एकमेव सासू-सुनेचे मंदिर बीडमध्ये

बीड शहरात सासु सुनेचे मंदिर उभा करण्यामागे एक विचार आहे. डॉ. रामचंद्र पारनेरकर महाराज यांच्या पत्नी सौभाग्यवती मनकर्णिका माता व त्यांची सून विमल माता या दोघी नात्याने सासू-सुन होत्या. यामध्ये मनकर्णिका यांचा मृत्यू 1950 मध्ये झाला तर विमल यांचा मृत्यू 1987 मध्ये झाला. या दोघींमध्ये प्रचंड स्नेह होता. त्याकाळात त्यांनी सासू-सुनेचे नाते कसे असावे हे आपल्या कृतीतून दाखवून दिले होते. भारतात एकत्र कुटुंब पद्धती महत्त्वाची मानली जाते. यामुळेच कुटुंब व्यवस्था अत्यंत भक्कम आहे. कौटुंबिक स्वास्थ्य जर टिकवायचे असेल तर घरात सासू-सुनांची नाते स्नेहाचे राहणे गरजेचे आहे हे जाणून पूर्णवाद वर्धिष्णू ॲड. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रेरणेने बीड ला सासू-सुनेचे मंदिर उभारण्यात आले. या मंदिराच्या माध्यमातून सासू-सुनेच्या नातेसंबंधात स्नेह निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम मोठ्या उत्साहाने राबवले जात असल्याचे सुमती पिंगळे या सांगतात.

यावर्षी या सासू-सुनांचा जन्मशताब्दी सोहळा साजरा होत आहे. यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये नारी फोरम आणि पूर्ण कन्या प्रतिष्ठान यांचा सहभाग आहे. समाजात नव्या आणि जुन्या पिढीतील महिलांना एकत्रित आणण्याचे कार्य या सासू-सुनेच्या मंदिराच्या माध्यमातून केले जात आहे. या सगळ्यामुळे आजच्या काळात विखरत चाललेली कुटुंब व्यवस्था मजबूत होण्यासाठी मदत होऊ शकते, असे ही जगदीश पिंगळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - आष्टी तालुक्यातील सांगवी पाटणमध्ये रोकड आणि दागिन्यांवर चोरांचा डल्ला

Last Updated : Jan 17, 2021, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.