ETV Bharat / state

धक्कादायक! बांधावरून झालेल्या वादात कोरोना रुग्ण चुलत भावाच्या अंगावर थुंकला; गुन्हा दाखल - agricultural dispute in beed

बांधावरून वाद निर्माण झाल्यानंतर राग आल्याने कोरोना रुग्ण चुलत भावाच्या अंगावर थुंकला; केज पोलिसांत गुन्हा दाखल

बांधावरून झालेल्या वादात कोरोना रुग्ण चुलत भावाच्या अंगावर थुंकला; गुन्हा दाखल

author img

By

Published : May 5, 2021, 9:43 AM IST

बीड- शेत नांगरणीवरून वाद झाल्याने कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्ण तोंडावरचा मास्क काढून त्याच्या चुलत भावाच्या तोंडावर व अंगावर थुंकल्याचा धक्कादायक प्रकार केज तालुक्यातील सारुकवाडी येथे घडला. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हा घरातच विलगीकरणात होता. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, सारुकवाडी येथील सुभाष फुंदे व त्याची आई कुसूम फुंदे हे दोघे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. ते दोघे सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. गावातील श्रीराम पांडुरंग फुंदे हे व त्यांचा मुलगा दीपक श्रीराम फुंदे हे दोघे बापलेक शेतात पळाट्या काढत होते. यावेळी त्यांना सुभाष फुंदे शेताची नांगरणी करत असताना दिसला. तेव्हा चुलत भाऊ दीपकने “तू आमच्या मालकीचे शेत नांगरु नको, तुझेच शेत नांगर’, असे म्हणाला. त्यावरून वाद निर्माण झाला असता, सुभाषने मास्क काढून दीपक यांच्या तोंडावर व अंगावर थुंकल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

चौघांविरुद्ध जीवघेणा साथ रोग पसरविण्याचा गुन्हा

यावेळी सुभाषची आई कुसुम फुंदे, पत्नी उषा फुंदे व वडील बळीराम फुंदे यांनी श्रीराम फुंदे व दिपक फुंदे यांना काठीने मारहाण केली. या प्रकरणी श्रीराम फुंदे यांनी रविवार २ मे रोजी केज पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून बळीराम फुंदे, सुभाष फुंदे, कुसुम फुंदे, उषा फुंदे या चौघांविरुद्ध जीवघेणा साथ रोग पसरविणे, निष्काळजीपणा व साथ रोग कायद्याचे उल्लंघन करणे, मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.