बीड- जिल्ह्यातील परळी येथे छोट्या कारणावरून झालेल्या भांडणात तलवारींचा वापर झाला. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. तलवारीचा वार नाकावर बसल्याने त्याचे नाक कापले आहे. परळी येथील संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
परळी शहरातील मिलिंदनगर भागात ही तलवारबाजीची घटना घडली. फारुख खान पठाण असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एकूण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले आहे.
सध्या सर्वत्र लॉक डाऊन मुळे नागरिक त्रस्त आहेत. तर दुसरीकडे परळी येथे शुल्लक कारणावरून तलवारबाजी ची घटना घडली आहे. आझाद नगर येथील रहिवाशी असलेल्या शेख शादुल, शेख गौस, शेख रशीद, शेख माहेबूब, शेख दाऊद व इतर दोघांनी मिळून तलवारीने रात्री मारहाण केली असल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यामध्ये धक्कादायक म्हणजे यात चक्क एकाचे नाक कापल्याचा प्रकार घडला आहे.
गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या फारुख याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहे. या घटनेनंतर परळी शहर परिसरात खळबळ उडाली होती. तर मिलिंद नगर भागात भीतीचे वातावरण पसरले होते.