ETV Bharat / state

जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजपने कार्यकर्त्यांनाही फसवले - सुरेश नवले

author img

By

Published : Apr 3, 2019, 12:03 PM IST

जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजपने कार्यकर्त्यांनाही फसवले.... माजी राज्यमंत्री सुरेश नवले यांचा आरोप..म्हणाले सावता परिषदेच्या खेत्रेंना खादी ग्राम उद्योगाच्या जिल्हाध्यक्षपदाचे दाखवले गाजर...

माजी राज्यमंत्री सुरेश नवले

बीड - भाजप नेत्यांकडून सामाजिक बांधिलकीच्या गप्पा मारल्या जातात. मात्र, कुठलाच शब्द त्यांच्याकडून पाळला जात नाही. भाजपने केवळ जनतेचीच फसवणूक केलीय, असे नाही तर भाजपकडून कार्यकर्त्यांचीदेखील फसवणूक झाली आहे, असा आरोप माजी राज्यमंत्री सुरेश नवले यांनी केला आहे.

बीड जिल्ह्यात सावता परिषदेच्या विष्णू खेत्रे या कार्यकर्त्याला पालकमंत्र्यांनी खादी ग्राम उद्योगचे जिल्हाध्यक्षपद देण्याची घोषणा हजारो लोकांसमोर केली होती. मात्र, अद्यापपर्यंत नियुक्तीपत्र दिले गेले नसल्याचा गंभीर आरोप सुरेश नवले यांनी केला. ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

माजी राज्यमंत्री सुरेश नवले

बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बीड जिल्ह्यातील माजी आ. सिरजोदीन देशमुख, जनार्दन तुपे यांची पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री मंत्री प्रा. सुरेश नवले म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ते आहेत. परळी -बीड -नगर रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करून प्रत्यक्षात रेल्वे बीड जिल्ह्यातून धावली पाहिजे, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे . बजरंग सोनवणे हे याबाबत प्रामाणिक प्रयत्न करतील, अशी आम्हाला खात्री असल्याचे नवले यावेळी म्हणाले.

बैलांच्या प्रश्नाबाबत बोलताना पत्रकार परिषद पालक मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून पोलीस सत्ताधाऱ्यांची बटीक झाली आहे. महिलांची सुरक्षा राहिली नाही. वडवणी येथील बंजारा समाजाच्या मुलची छेडछाड झाली म्हणून तिने आत्महत्या केली. तर शिरुर तालुक्यात एका महिलेची नग्न करून धिंड काढली. या सगळ्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यात यात पालकमंत्री महिला असतानादेखील महिलांना सुरक्षितता वाटत नाही, असा आरोपही यावेळी प्राध्यापक सुरेश नवले यांनी केला आहे.

Intro:भाजप कडून कार्यकर्त्यांचीही केलीय फसवणूक, पदांची घोषणा करूनही पंकज मुंडे यांनी दिले नाही पद, माजी राज्यमंत्री सुरेश नवले यांचा आरोप

बीड- भाजपचा नेत्यांकडून सामाजिक बांधिलकीच्या गप्पा मारल्या जातात मात्र शब्द कुठल्या पाळले जात नाही. भाजपा ने केवळ जनतेची फसवणूक केली असे नाही तर भाजप कडून कार्यकर्त्यांची देखील फसवणूक झाली असल्याचा आरोप माजी राज्यमंत्री सुरेश नवले यांनी मंगळवारी केला. पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यात सावता परिषदेचे विष्णू खेत्रे या कार्यकर्त्याला पालकमंत्र्यांनी खादी ग्राम उद्योग चे जिल्हाध्यक्ष पद हजारो लोकांसमोर देण्याची घोषणा केली मात्र अद्याप पर्यंत नियुक्तीपत्र दिले गेलेले नाही. असा आरोप सुरेश नवले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला आहे.

Body:बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बीड जिल्ह्यातील माजी आ. सिरजोदीन देशमुख, जनार्दन तुपे यांची पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री मंत्री प्रा. सुरेश नवले म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ते आहेत. परळी -बीड -नगर रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करून प्रत्यक्षात रेल्वे बीड जिल्ह्यातून धावली पाहिजे, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे . बजरंग सोनवणे हे याबाबत प्रामाणिक प्रयत्न करतील अशी आम्हाला खात्री असल्याचे नवले यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

Conclusion:बैलांच्या प्रश्नाबाबत बोलताना पत्रकार परिषद पालक मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून पोलीस सत्ताधाऱ्यांची बटीक झाली आहे. महिलांची सुरक्षा राहिली नाही. वडवणी येथील बंजारा समाजाची मुलगी तिने छेडछाड झाली म्हणून आत्महत्या केली. शिरूर तालुक्यात एका महिलेची नग्न करून धिंड काढली. या सगळ्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यात यात पालकमंत्री महिला असतानादेखील महिलांना सुरक्षित वाटत नाही. असा आरोपही यावेळी प्राध्यापक सुरेश नवले यांनी केला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.