ETV Bharat / state

चोरट्यांचा महामार्गावर धुमाकूळ; भाविकांच्या कारवर हल्ला करून लूटमार, महिला जखमी - injured

या हल्ल्यात चोरट्यांनी पुरुषांसह महिलांनाही या बेदम मारहाण केली आहे. तसेच, त्यांच्याकडुन रोख रक्कम २५ हजार आणि ७ ते ८ तोळे सोनेदेखील लंपास केले आहेत.

भाविकांच्या कारवर हल्ला करून लूटमार
author img

By

Published : Apr 26, 2019, 10:03 AM IST

बीड - औरंगाबादहुन तुळजापूरकडे देवीच्या दर्शनाला जात असताना धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर भाविकांच्या गाडीवर चोरट्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. बीड तालुक्यातील चौसाळा बायपासवर पंक्चर झालेल्या कारचे टायर बदलत असताना शुक्रवारी (२६ एप्रिल) रात्री १ वाजता चोरट्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात चोरट्यांनी पुरुषांसह महिलांनाही या बेदम मारहाण केली आहे. तसेच, त्यांच्याकडुन रोख रक्कम २५ हजार आणि ७ ते ८ तोळे सोनेदेखील लंपास केले आहेत. कारमध्ये एकूण ४ जण होते. त्यामध्ये २ पुरुष आणि २ महिलासह २ लहान मुलांचा समावेश होता. जखमीवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भाविकांच्या कारवर हल्ला करून लूटमार

बाळासाहेब त्रिंबक डोने, वैशाली बालासाहेब डोने, भागीरथी त्रिंबकराव डोने आणि वाहन चालक राजू राजपूत यांच्या सह २ लहान मुलांचा कारमध्ये समावेश होता. औरंगाबादहुन तुळजापूरकडे (क्र. एम एच २० डी. एफ.-०७३९) कारमधून हे सर्वजण प्रवास करत होते. चौसाळा बायपासवर कार पंक्चर झाल्यामुळे टायर बदलत असताना ५ ते ६ जण गाडीच्या दिशेने आले. 'पैसे द्या' म्हणून त्यांनी जोरदार मारहाण सुरू केली. यावेळी त्यांनी महिलांनाही मारहाण केली. नंतर रोख रक्कम २५ हजार आणि सोने लुटून चोरटे लंपास झाले असल्याचे बाळासाहेब डोणे यांनी सांगितले. घटनेनंतर चौसाळा पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

लुटमारीची ही घटना नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. चौसाळा बायपासवर यापूर्वीही अशा प्रकारच्या लुटमारीच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र, पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही चौसाळा येथील नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळेस बीड चौसाळा बायपासवर गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेत जखमी झालेले बालासाहेब डोने , वैशाली डोने व भागीरथी डोने यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Intro: भाविकांच्या कारवर हल्ला करत केली लूटमार; चोरट्यांचा महामार्गावरच धुमाकूळ, महिला जखमी

बीड- धुळे सोलापुर या राष्ट्रीय महामार्गावर औरंगाबाद हुन तुळजापूर कडे देवीच्या दर्शनाला जात असताना बीड तालुक्यातील चौसाळा बायपासवर पंचर झालेल्या कार चे टायर बदलत असताना शुक्रवारी पहाटे 1 वाजता चोरट्यांनी हल्ला केला. यामध्ये पुरुषांसह महिलांनाही बेदम मारहाण अज्ञात चोरट्यांनी केली आहे. रोख रक्कम पंचवीस हजार व सात ते आठ तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले आहे. कारमध्ये एकूण चार जण होते. त्यामध्ये दोन पुरुष व दोन महिलां सह दोन लहान मुलांचा समावेश होता. जखमीवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Body:बाळासाहेब त्रिंबक डोने, वैशाली बालासाहेब डोने. भागीरथी त्रिंबकराव डोने व वाहन चालक राजू राजपूत यांच्या सह दोन लहान मुलांचा कारमध्ये समावेश होता. औरंगाबाद हुन तुळजापूर कार क्र. एम एच 20 डी. एफ.-0730 या कारमधून तुळजापूर कडे जात असताना शुक्रवारी पहाटे एक वाजता बीड तालुक्यातील चौसाळा बायपासवर कार पंक्चर झाली टायर बदलत असताना पाच ते सहा जण गाडीच्या दिशेने आले. येताच पैसे द्या म्हणून जोरदार मारहाण सुरू केली. यावेळी त्यांनी चोरट्यांनी महिलांनाही बेदम मारहाण केली. नंतर रोख रक्कम 25000 व 7 ते 8 तोळे सोने लुटून चोरटे लंपास झाले असल्याचे बालासाहेब डोणे यांनी सांगितले. घटनेनंतर चौसाळा पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Conclusion:सदरील घटना नेकनूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. चौसाळा बायपासवर यापूर्वी कधीही अशा प्रकारच्या लुटमारीच्या घटना घडलेल्या नाहीत. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही चौसाळा येथील नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळेस बीड चौसाळा बायपासवर गस्त वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेत जखमी झालेले बालासाहेब डोने , वैशाली डोने व भागीरथी डोने यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.